Taiwan Earthquake: तैवानमध्ये ६ तासांत ८० भूकंपाचे धक्के, अनेक इमारती जमीनदोस्त

135
Taiwan Earthquake: तैवानमध्ये ६ तासांत ८० भूकंपाचे धक्के, अनेक इमारती जमीनदोस्त

तैवानमध्ये पुन्हा मोठा भूकंप झाला. सोमवारी, (२३ एप्रिल) देशाच्या पूर्व किनारपट्टीवर सायंकाळी ५ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत ८० भूकंपाचे धक्के जाणवले. ६.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. भारतीय वेळेनुसार रात्री बाराच्या सुमारास काही मिनिटांच्या अंतराने हे दोन्ही धक्के बसले. यावेळी तैवानमध्ये रात्रीचे २:२६ आणि २:३२ वाजले होते.

हवामान विभागाने सांगितले की, भूकंपाचा केंद्रबिंदू पूर्वेकडील हुआलियन प्रांतात (Hualien Province) जमिनीपासून ५.५ किलोमीटर खाली होता. भूकंपामुळे हुआलियनमधील २ इमारतींचे नुकसान झाले आहे. एक इमारत कोसळली आणि दुसरी रस्त्याकडे झुकली. जपान, चीन आणि फिलिपाइन्समध्येही भूकंपाचे हलके धक्के जाणवले. सध्या कोणत्याही नुकसानीचे वृत्त नाही.

(हेही वाचा – Mulund Crime : डान्सबारची खबर दिल्याच्या संशयावरून बार मालकाकडून एकाला बेदम मारहाण )

भारतीय वेळेनुसार, पहाटे साडेपाच वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या, लँड स्लाइड्सही झाल्या. तेव्हापासून तैवानमध्ये शेकडो भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. तैवानच्या सेंट्रल वेदर ब्युरोच्या मते, तैवानमध्ये २५ वर्षांतील हा सर्वात शक्तिशाली भूकंप होता. अग्निशमन विभागाने सांगितले की, ३ एप्रिलच्या भूकंपात नुकसान झालेले हुअलियनमधील हॉटेल भूकंपामुळे थोडेसे खाली झुकले आहे.

भूकंपासाठी संवेदनशील
यापूर्वी 3 एप्रिल रोजी तैवानमध्ये ७.५ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता, ज्यामध्ये सुमारे १४ लोकांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी हुआलियन शहरातच भूकंप झाला होता. त्याचे केंद्र पृथ्वीपासून ३४ किलोमीटर खाली होते. तैवान हा दोन टेक्टोनिक प्लेट्सच्या जंक्शनवर वसलेला देश आहे, जो भूकंपासाठी संवेदनशील मानला जातो. २०१६ मध्ये दक्षिण तैवानमध्ये झालेल्या भूकंपात १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. यापूर्वी १९९९ मध्ये ७.३ तीव्रतेच्या भूकंपात २,०००हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

राष्ट्रीय भूकंप माहिती केंद्रानुसार…
दरवर्षी जगात अनेक भूकंप होतात, पण त्यांची तीव्रता कमी असते. राष्ट्रीय भूकंप माहिती केंद्र दरवर्षी सुमारे २०,००० भूकंपांची नोंद करते. यापैकी १०० भूकंप असे आहेत की, ज्यामुळे जास्त नुकसान होते. भूकंप काही सेकंद किंवा काही मिनिटे टिकतो. इतिहासातील सर्वात जास्त काळ टिकणारा भूकंप २००४ मध्ये हिंदी महासागरात झाला होता. हा भूकंप १० मिनिटे झाला होता.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.