हिंदु राष्ट्र स्थापनेचा संकल्प पूर्ण करण्यासाठीच आम्ही जन्माला आलो आहोत! – टी. राजासिंह

207
हिंदु राष्ट्र स्थापनेचा संकल्प पूर्ण करण्यासाठीच आम्ही जन्माला आलो आहोत! - टी. राजासिंह
हिंदु राष्ट्र स्थापनेचा संकल्प पूर्ण करण्यासाठीच आम्ही जन्माला आलो आहोत! - टी. राजासिंह

मला हिंदुत्वासाठी जगायचे आहे. आज ना उद्या मृत्यू निश्चित आहे, तर इतिहासात नोंद होईल, असे मरण का नको? देश आणि धर्म यांसाठी आम्ही मरायलाही सिद्ध आहोत. हिंदु राष्ट्र स्थापनेचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही जन्माला आलो आहोत. तेलंगणा आणि आंध्रप्रदेश येथे राज्यकर्ते धर्मांधांचे लांगुलचालन करत आहे. मुसलमानांच्या लांगुलचालनासाठी मशिदी बांधणे, मदरशांना अनुदान देणे, मौलवींना वेतन देणे यांसाठी निधी दिला जातो; गोरक्षण करणार्‍या हिंदूंवर गुन्हे नोंदवले जातात. बंगालप्रमाणे तेलंगाणामध्येही हिंदूंवर अत्याचार चालू आहेत, असे प्रतिपादन ‘तेलंगणा येथील भाजपचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांनी केले. ते ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त ‘तेलंगणा येथील हिंदुद्रोही सरकारची दडपशाही, तसेच हिंदु राष्ट्राचा संघर्ष’ या विषयावर बोलत होते.

टी. राजासिंह पुढे म्हणाले, ‘‘मला हिंदु धर्मावरील आघात रोखण्यासाठी आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी हिंदूंनी निवडून दिले आहे. अनेक राज्यांत हिंदूंच्या हत्या असून येणार्‍या संकटांविषयी हिंदू अनभिज्ञ आहेत. स्वत:च्या रक्षणासाठी हिंदू युवक आणि युवती यांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. तरच हिंदू स्वत:चे आणि धर्माचे रक्षण करू शकतील. सर्व हिदूंनी एकत्र येऊन भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची मागणी केल्यास भारताला हिंदु राष्ट्र होण्यास वेळ लागणार नाही. हिंदु राष्ट्रासाठी हिंदूंनी सरकारवर दबाव आणायला हवा.’’

पुढील अधिवेशनापूर्वी १ हजार गावांमध्ये हनुमान चालीसा चालू करणार! – कमलेश कटारिया

या प्रसंगी छत्रपती संभाजीनगर येथील ‘संकल्प हिंदु राष्ट्र अभियाना’चे अध्यक्ष कमलेश कटारिया म्हणाले, ‘‘हिंदु राष्ट्राच्या कार्यात हिंदूंना सहभागी करून घेण्यासाठी आम्ही प्रत्येक शनिवारी ११४ गावांमध्ये ‘हनुमान चालीसा’चे पठण करतो. या माध्यमांतून ४ हजारहून अधिक हिंदू एकत्र येतात. पुढील वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाला येण्यापूर्वी १ हजार गावांमध्ये हनुमान चालीसा चालू करून ३० हजार युवकांना एकत्र करण्याचा आम्ही संकल्प केला आहे.

(हेही वाचा – बॅंका, पोस्ट आणि दूरसंचार विभागाच्या सुविधा आता रेशन दुकानात मिळणार)

नांदेड येथे गोरक्षकांवर झालेल्या आक्रमणाचा ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त निषेध!

नांदेड (महाराष्ट्र) येथे १९ जूनला रात्री चारचाकी वाहनातून जाणार्‍या गोरक्षकांवर एका टोळीने प्राणघातक आक्रमण केले. या आक्रमणात ४ गोरक्षक गंभीररित्या घायाळ झाले असून १ गोरक्षकाचा मृत्यू झाला. गोरक्षकांवर झालेल्या या आक्रमणाच्या निषेधार्थ ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त निषेधाचा ठराव संमत करण्यात आला. या प्रसंगी अमरावती येथील श्री १००८ महाशक्ती पीठाधीश्वर श्री शक्तीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची अनमोल शिकवण’ (खंड १) : साधना प्रत्यक्ष शिकवण्याच्या पद्धती’ या मराठी आणि हिंदी भाषेतील ‘ई-बुक’चे प्रकाशन करण्यात आले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.