-
ऋजुता लुकतुके
स्विगी कंपनीने शहरात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वस्तू व पार्सल पोहोचवण्याची आपली ‘स्विगी जिनी’ सेवा अधिकृत घोषणा न करताच बंद केली आहे. काही शहरांमध्ये स्विगीच्या ॲपवर ही सेवा दिसणं बंद झालं आहे. तर जिथे ॲॅपवर अजूनही सेवा दिसते, तिथे ‘ही सेवा सध्या उपलब्ध नाही,’ असा संदेश येत आहे. एप्रिल २०२० मध्ये स्विगीने ही सेवा लाँच केली होती. करिअर सेवेप्रमाणे एका शहरात वस्तूंची देवाण घेवाण करणारी ही सेवा होती. ७० शहरांमध्ये ही सेवा उपलब्ध होती. (Swiggy Genie)
(हेही वाचा – IPL 2025, Virat Kohli : आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या नावावर अभूतपूर्व विक्रम)
यापूर्वी २०२२ मध्ये एकदा कंपनीने ही सेवा तात्पुरती बंद केली होती. पण, त्यावेळी स्विगीच्या अन्नपदार्थ घरपोच पोहोचवण्याच्या सेवेची मागणी वाढली होती. ती पूर्ण करता यावी यासाठी कंपनीने इतर सेवा तात्पुरत्या बंद केल्या होत्या. कोरोनानंतर घरपोच अन्नपदार्थ पोहोचवण्याची सेवा वाढली. स्विगीची ही सेवा ५०० शहरांमध्ये सुरू झाली होती. यावेळी स्विगीला १० मिनिटांत अन्नपदार्थ घरी पोहोचवणारी बोल्ट ही सेवा वाढवायची आहे. त्यापासून लक्ष विचलित होऊ नये, यासाठी कंपनीने जिनी सेवा बंद केली असावी असा अंदाज आहे. बोल्ट सेवा आता देशातील ५०० शहरांत सुरू होणार आहे. रेस्टाँरंट ते घर हे अंतर २ किलोमीटरच्या आत असेल तर ग्राहकांना बोल्ट सेवेचा लाभ घेता येणार आहे. (Swiggy Genie)
(हेही वाचा – Maharashtra HSC Results 2025 : बारावीचा निकाल जाहीर ; यंदाही कोकण विभागाने मारली बाजी)
जिनी सेवेविषयी लोकांनी ट्विटरवर स्विगीला भरपूर प्रश्न विचारले आणि त्यावर कंपनीने जरुर उत्तरं दिली आहे. ‘जिनीला पण तुमची आठवण येत आहे. पण, सध्या तिने थोडी विश्रांती घ्यायचं ठरवलं आहे. पण, तुमच्या इच्छा ती जरुर ऐकतेय आणि काही दिवसांतच तुमच्या सेवेत पुन्हा रुजू होईल,’ असं एका उत्तरादाखल कंपनीनं म्हटलं होतं. पण, नेमकं कधी याची काहीही टाईमलाईन दिलेली नाही. स्विगी बोल्ट सेवेवर लक्ष केंद्रीत करत असताना प्रतिस्पर्धी कंपनी झोमॅटोनं आपल्या १५ मिनिटांत अन्नपदार्थ आणि वस्तू पुरवणाऱ्या क्विक आणि एव्हरीडे या सेवा बंद केल्या आहेत. (Swiggy Genie)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community