Swatantryaveer Savarkar Memorial : सेल्युलर जेल परिसरात स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर(Swatantryaveer Savarkar) यांचे उचित स्मारक व्हावे असा महाराष्ट्र शासनाचा मानस असून त्यादृष्टीने राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी शुक्रवार, १६ मे २०२५ रोजी अंदमान निकोबारचे मुख्य सचिव डॉ चंद्र भूषण कुमार यांची भेट घेतली. दरम्यान, राज्याचे सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड आशिष शेलार आज अंदमान निकोबार दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी सेल्युलर जेल येथे जाऊन स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर(Swatantryaveer Savarkar) यांच्या स्मृतींना अभिवादन केले.
यावेळी ज्या काळ कोठडीत सावरकरांना ठेवण्यात आले होते तिथे जाऊन मंत्री आशिष शेलार नतमस्तक झाले. त्यांनी या दौऱ्यात अंदमान निकोबार चे मुख्य सचिव डॉ चंद्र भूषण कुमार यांची भेट घेऊन सावरकर स्मारकाबाबतची महाराष्ट्र शासनाची भूमिका मांडली. ज्या सेल्युलर जेल मधे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशासाठी कारावास भोगला त्या सेल्युलर जेलचा परिसर, अंदमान निकोबार या बेटाशी महाराष्ट्रातील तमाम सावरकर प्रेमींच्या असंख्य आठवणी आणि भावना जोडलेल्या आहेत. त्यामुळे या परिसरात सावरकरांचे उचित स्मारक व्हावे अशी महाराष्ट्र शासनाची इच्छा आहे.
यापूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना विनंती पत्र ही लिहित मंत्री शेलार यांनी हा विषय केंद्र सरकारकडे ही मांडला होता. राज्य सरकारने जी स्मारकाची संकल्पना मांडली आहे त्या प्रस्तावात स्वातंत्र्यवीर सावरकर आणि इतर क्रांतिकारकांच्या कार्याचे चित्रण करणारा भव्य पुतळे, शिल्पफलक, डिजिटल संग्रहालय आणि माहिती केंद्र उभारण्याची संकल्पना आहे. महाराष्ट्र सरकार या स्मारकाच्या उभारणीत पूर्णपणे कटिबद्ध असून, स्थानिक प्रशासनाकडून सहकार्य मिळाल्यास हे स्मारक उभे राहू शकेल, असा विश्वास मंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केला.(Swatantryaveer Savarkar)
Join Our WhatsApp Community