Arvind Kejriwal यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका! 

230
Arvind Kejriwal यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका! 

दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात (Delhi Liquor Policy Scam Case) जामिनावर असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात नवी याचिका दाखल केली होती. त्यात त्यांनी वैद्यकीय स्थितीच्या आधारे जामीन आणखी ७ दिवस वाढवण्याची मागणी केली होती. केजरीवाल यांना ईडीने २१ मार्च रोजी अटक केली होती. केजरीवाल यांचा २१ दिवसांचा जामीन १ जून रोजी संपत आहे. आम आदमी पार्टीच्या (Aam Aadmi Party) म्हणण्यानुसार, त्यांच्या अटकेनंतर केजरीवाल यांचे वजन ७ किलोने कमी झाले आहे. जे एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते.  तसेच न्यायमूर्ती ए एस ओक (Justice AS Oak) यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने केजरीवाल यांच्या आरोग्य तपासणीसाठी अंतरिम जामीन ७ दिवसांनी वाढवण्याच्या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला. इतकेच नाही तर अर्ज उशीरा दाखल करण्यावरही खंडपीठाने प्रश्न उपस्थित केले आहेत. (Arvind Kejriwal )

(हेही वाचा – Veer Savarkar : अंदमान हिंदुत्वाची कार्यशाळा)

न्यायमूर्ती एएस ओक यांच्या खंडपीठाने सांगितले की, मुख्य प्रकरणावरील आदेश १७ मे रोजी राखून ठेवण्यात आला होता. त्या खंडपीठाचे एक सदस्य न्यायाधीश गेल्या आठवड्यात सुट्टीतील खंडपीठात होते. तेव्हा ही मागणी का केली नाही? सुट्टीतील खंडपीठाने केजरीवाल यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी (Adv Abhishek Manu Singhvi) यांना सरन्यायाधीशांना सुनावणीसाठी विनंती करण्यास सांगितले. (Arvind Kejriwal)

(हेही वाचा – निसर्गाचा कोप! Papua New Guinea मध्ये अख्ख गाव दरडीखाली दबलं; २००० हून अधिक लोकांचा मृत्यू)

दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना दिल्लीच्या कथित मद्य धोरण घोटाळ्यात मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली ईडीने २१ मार्च रोजी अटक केली होती. केजरीवाल यांनी त्यांच्या अटकेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. नुकताच सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी १० मे ते १ जून या कालावधीत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. त्यांना २ जून रोजी आत्मसमर्पण करायचे आहे. (Arvind Kejriwal )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.