Military Training : पहिलीपासून विद्यार्थ्यांना मिळणार सैनिकी प्रशिक्षण; मंत्री दादा भुसेंची घोषणा

Military Training : माजी सैनिक, क्रीडा शिक्षक, एनसीसी, स्काउट-गाइडचे शिक्षक हे विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षणाचे धडे देतील

85

“विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची जाणीव निर्माण व्हावी, ‘नेशन फर्स्ट’ (Nation First) हा विचार रुजविण्याच्या उद्देशाने इयत्ता पहिलीपासूनच सैनिकी शिक्षणाचे (Military Training) प्राथमिक स्तरावरील प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाईल. माजी सैनिक, क्रीडा शिक्षक, एनसीसी, स्काउट-गाइडचे शिक्षक हे विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षणाचे धडे देतील,” अशी घोषणा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी केली आहे. ‘समर युथ समिट २०२५’ या दोन दिवसीय निवासी शिबिराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.

(हेही वाचा – Nashik-Trimbakeshwar Simhastha च्या निमित्ताने नाशिकचा होणार कायापालट; सहा हजार कोटी रुपयांच्या निविदा अंतिम टप्प्यांत)

शिक्षणातून देशप्रेम निर्माण करणार

या वेळी दादा भुसे पुढे म्हणाले, “विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षण देण्याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), अजित पवार, माजी सैनिक कल्याणमंत्री शंभुराज देसाई यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल. नुकतेच जिल्हा परिषदेच्या ४८ शिक्षकांना सिंगापूर येथे अभ्यास दौऱ्यासाठी पाठविले होते. तेथील शिक्षण व्यवस्थेमध्ये ‘राष्ट्र प्रथम’ ही संकल्पना असल्याचे शिक्षकांनी सांगितले. महाराष्ट्रामध्येही शालेय शिक्षणात आमूलाग्र बदल करत असून, शिक्षणातून देशप्रेमाची भावना निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला जाणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून शालेय शिक्षणात बदल दिसून येईल.”

शालेय सहल जाणार बँकेत आणि शेतकऱ्यांच्या बांधावर

मंत्री दादा भुसे म्हणाले, “शालेय विद्यार्थ्यांची सहल शेतकऱ्यांच्या बांधावर नेली जाईल. बळीराजा कशा प्रकारे कष्टाने पिकवतो, याची जाणीव त्यांना या माध्यमातून होईल. तसेच सहल बँकेत, रुग्णालयासह इतर विविध ठिकाणी नेताना तेथील व्यावहारिक ज्ञान विद्यार्थ्यांना दिले जाईल. गड-किल्ल्यांवर नेताना गौरवशाली इतिहासाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचविली जाईल.” (Military Training)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.