प्रामाणिकपणा हा श्वानाचा स्थायी स्वभाव समजला जातो. त्यांच्या या गुणधर्माचे कौतुक करणारे व्हिडीओ सोशल मीडियात खूप पाहायला मिळतात, पण याच श्वानांनी (Street Dog) भारत – पाकिस्तान सीमेवर पाकिस्तानकडून दहशतवाद्यांची होणारी घुसखोरी थांबवली असल्याचेही समोर आले आहे. सीमावर्ती भाग तसा डोंगराळ कुठे जंगलाचा आहे. त्याचाच गैरफायदा घेऊन पाकिस्तानमधून दहशतवाद्यांची भारतात घुसखोरी होत असते. पण अशी घुसखोरी करणारे घुसखोर सीमावर्ती भागातील भटक्या कुत्र्यांच्या (Street Dog) नजरेतून सुटत नाही. त्यांच्यामुळे भारतीय सीमेवर तैनात जवानांना सीमेवरून घुसखोरी होत असल्याचे समजते आणि ही घुसखोरी हाणून पाडली जात आहे. यासाठी भटके कुत्रे (Street Dog) मोलाची भूमिका बजावत आहेत.
१६ कॉर्प्स कमांडर लेफ्टनंट जनरल आर.आर. निंभोरकर यांच्या मते, दहशतवादी पाकिस्तानच्या सीमेवरून भारताच्या सीमेमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा देशी भटके कुत्रे (Street Dog) भुंकू लागतात आणि जवळच्या सैनिकांना सतर्क करतात. त्यांच्या वेळेवर दिलेल्या इशाऱ्यांमुळे घुसखोरीचे अनेक प्रयत्न हाणून पाडण्यात मदत झाली आहे. हे कुत्रे (Street Dog), विशेष प्रशिक्षण घेतलेले नसतानाही इलेक्ट्रॉनिक सेन्सर्सपेक्षा अधिक प्रभावी सिद्ध झाले आहेत, विशेषतः नागरोटासारख्या सीमावर्ती भागात त्यांचा फायदा खूप होत आहे.या कुत्र्यांची (Street Dog) नैसर्गिक सतर्कता आणि भूप्रदेशाची ओळख संवेदनशील भागात तैनात असलेल्या सैन्यासाठी विशेष उपयुक्त बनवते. त्यांच्या हा उपयोग ओळखूनच भारतीय सैन्य आता या कुत्र्यांना (Street Dog) खायला घालण्यासाठी आणि त्यांची काळजी घेण्यासाठी प्रोत्साहित करत आहे जेणेकरून या कुत्र्यांची एक मजबूत फौज निर्माण होईल आणि महत्त्वाच्या ठिकाणी त्यांची उपस्थिती कायम राहील.
Join Our WhatsApp Community