Accident : पुण्यात विचित्र अपघात, चार गाड्यांची एकमेकांना धडक

77

कोथरूड येथील वेदभवन पुलावर सोमवारी, 16 जून रोजी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात (Accident) घडला. यावेळी 3 ते 4 चारचाकी वाहनांनी एकमेकांना धडक दिल्याने मोठी धावपळ उडाली. या अपघातात एका वाहनाचा चालक गाडीत अडकून पडला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रसंगावधान राखून तात्काळ बचावकार्य राबवत या चालकाला जखमी अवस्थेत वाहनाबाहेर काढले. त्यानंतर तातडीने रुग्णवाहिकेच्या मदतीने त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पहाटे अपघात 

सोमवारी पहाटे साडेचार वाजल्यापासून पुण्यात हलकेसे धुके आणि सकाळची गडद हवा होती. अशात वेदभवन पुलावर भरधाव वेगाने जात असलेल्या चारचाकी वाहनांनी एकमेकांना जोरदार धडक दिली. अपघात (Accident) इतका जबरदस्त होता की एका गाडीचा समोरील भाग पूर्णपणे चुरडला गेला आणि चालक गाडीत अडकून पडला. अन्य दोन गाड्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.

(हेही वाचा PM Modi Visits Cyprus : पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान; दोन्ही देशांत व्यापारवाढीस चालना मिळणार)

अग्निशमन दलाची तात्काळ मदत

अपघाताची (Accident) माहिती मिळताच कोथरूड अग्निशमन केंद्राच्या दोन गाड्या आणि पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी काटेकोरपणे रेस्क्यू ऑपरेशन राबवत अडकलेल्या चालकाला सुरक्षित बाहेर काढले. यावेळी पोलीस पथकानेही मदत करत अपघातस्थळी गर्दी रोखली आणि वाहतूक सुरळीत केली. जखमी चालकाला रुग्णवाहिकेद्वारे जवळील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.