Dr. Babasaheb Ambedkar यांच्या मिरवणुकीवर दगडफेक; साहिल लाला बागवान, समीर लाला बागवान, इसाक मिस्त्री, कल्लू पठाणसह 7 जणांना अटक

665

धुळे येथे रविवारी, १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या जयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीला जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात आले. एका विशिष्ट समुदायाच्या 21 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी आतापर्यंत 7 जणांना अटक करण्यात आली आहे. 14 एप्रिल रोजी मिरवणुकीत सहभागी झालेल्या लोकांवर आरोपींनी दगडफेक केल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी साहिल लाला बागवान, समीर लाला बागवान, इसाक मिस्त्री, कल्लू पठाण, विहान बागवान, कौसर मुसा खाटिक आणि अज्या खाटिक यांना अटक केली. या प्रकरणी भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 143, 146, 147, 149, 295 आणि 296 अंतर्गत 21 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय इतर अनेक संबंधित कलमेही लावण्यात आली आहेत.

मिरवणुकीला मशिदीजवळून जाण्यास विरोध

ही घटना 14 एप्रिल रोजी संध्याकाळी घडली. बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांची मिरवणूक स्थानिक जामा मशिदीजवळून जात असताना मुसलमानांनी तरुणांनी मिरवणुकीला त्या मार्गावरून जाण्यापासून रोखले. नंतर त्यांनी मिरवणुकीत सहभागी झालेल्या लोकांवर दगडफेक सुरू केली. या दगडफेकीत अनेक जण जखमी झाले. दगडफेक होत असल्याचे पाहून काही लोकांनी तातडीने फोन करून स्थानिक पोलीस ठाण्यात माहिती दिली. यानंतर एसपी श्रीकांत धिवरे आपल्या टीमसह घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर गोविंदा गुलाब नागराळे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी एफआयआर नोंदवला.

(हेही वाचा Iran Israel War : इराणचा इस्राईलवरील हवाई हल्ला ठरला प्रभावहीन; कोण आहे यामागे कारणीभूत?)

हल्ल्यात अनेक लोक जखमी

नागराळे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, “मिरवणूक जामा मशिदीजवळून शांततेत जात असताना एका विशिष्ट समाजातील काही लोकांनी (Dr. Babasaheb Ambedkar) मिरवणुकीत सहभागी झालेल्या लोकांना थांबण्याची धमकी दिली. ते म्हणाले की, मशिदीजवळून मिरवणूक जाणार नाही. नंतर त्यांनी मिरवणुकीत सहभागी झालेल्या लोकांवर दगडफेक सुरू केली. दगडफेकीदरम्यान घोषणाबाजीही करण्यात आली. या हल्ल्यात अनेक लोक जखमी झाले आहेत. दरम्यान, पोलिसांनी प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला असून कोणतीही मोठी घटना घडली नसल्याचे सांगितले. मिरवणुकीत सहभागी झालेल्या लोकांवर दगडफेक करणाऱ्या काही लोकांची पोलिसांनी ओळख पटवली आहे. पापा शाह, सादिक शाह, वसीम पठाण, सुलतान बिल्डर, जुनैद शाह, तौफिक, शोएब अशी ज्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.