State Government : चेंबूर येथील शासकीय वसतिगृहाकरिता २ कोटी ८१ लाखांचा निधी खर्च करणार

एक हजार विद्यार्थ्यांसाठी लोखंडी कॉटपासून सीसीटीव्हीपर्यंत सुविधा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दिलासा

55
State Govt : १ कोटींच्या 'स्मार्ट' खरेदीला ब्रेक! मंत्रिमंडळासाठी आयपॅड खरेदीचा निर्णय रद्द
  • प्रतिनिधी

चेंबूरमधील नव्याने सुरू करण्यात आलेल्या शासकीय वसतीगृहातील एक हजार विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सोयीसुविधा पुरवण्यासाठी राज्य सरकारने २ कोटी ८१ लाख ६४ हजार रुपये खर्च करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या योजनेतून ही सुविधा दिली जाणार आहे. राज्यातील मागासवर्गीय मुला-मुलींच्या शैक्षणिक विकासासाठी वसतीगृह योजना राबवली जाते. सध्या राज्यात ४४३ शासकीय वसतीगृहे कार्यरत असून, त्यात एकूण ४३,८५८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना निवास, जेवण, शैक्षणिक साहित्य, गणवेश, निर्वाह भत्ता, आणि मुलींसाठी स्वच्छता भत्ता यांसारख्या महत्त्वाच्या सुविधा दिल्या जातात. (State Government)

(हेही वाचा – Bengaluru Stampede : चिन्नास्वामी मैदानावरील चेंगराचेंगरी बंगळुरूला पडली महागात; बीसीसीआयने सामने हलवले)

चेंबूर वसतीगृहासाठी काय मिळणार?

चेंबूर येथील नव्या वसतीगृहातील विद्यार्थ्यांसाठी खालील वस्तूंची खरेदी होणार आहे: लोखंडी कॉट, कार्यालयीन टेबल, संगणक, वॉटर प्युरिफायर, डायनिंग टेबल, लाकडी टेबल व खुर्च्या (हात असलेल्या), अग्नीशामक यंत्र, सीसीटीव्ही प्रणालीसाठी साहित्य या सर्व सुविधांमुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व सामाजिक विकास अधिक गतिमान होणार असून, वसतीगृहातील वातावरण अधिक सुरक्षित आणि आधुनिक होणार आहे. (State Government)

(हेही वाचा – कोलकता पोलिसांवर हल्ला करणारा मोहम्मद सुलतान निघाला Bangladesh Infiltrator)

सरकारचा विद्यार्थ्यांवरील विश्वास

राज्य सरकारचा हा निर्णय विद्यार्थ्यांना केवळ भौतिक सुविधा देणारा नसून, त्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या प्रवासात मोठा आधार ठरणार आहे. विशेषत: मागासवर्गीय विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे शैक्षणिक स्पर्धेत सक्षम होण्याची नवी संधी मिळणार आहे. चेंबूरमधील नव्या वसतीगृहातील विद्यार्थ्यांना जीवनावश्यक व शैक्षणिक सुविधा मिळाव्यात यासाठी राज्य सरकारकडून मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. ही योजना म्हणजे केवळ एक घोषणा नव्हे, तर शिक्षणात समानता निर्माण करण्याचा ठोस आणि सकारात्मक टप्पा आहे. (State Government)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.