Starlink in India : एलॉन मस्क यांच्या स्टारलिंकला भारतात इंटरनेट सेवा सुरू करण्याची परवानगी

ही उपग्रहावर आधारित इंटरनेट सेवा असणार आहे.

50
Starlink in India : एलॉन मस्क यांच्या स्टारलिंकला भारतात इंटरनेट सेवा सुरू करण्याची परवानगी
Starlink in India : एलॉन मस्क यांच्या स्टारलिंकला भारतात इंटरनेट सेवा सुरू करण्याची परवानगी
  • ऋजुता लुकतुके

एलॉन मस्क (Elon Musk) यांच्या स्टारलिंक कंपनीला (Starlink Company) भारतात उपग्रह इंटरनेट सेवा सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. दूरसंचार नियामक मंडळाने कंपनीला परवानगीचं पत्रं देऊ केलं आहे. उपग्रह इंटरनेट सेवा असल्यामुळे तिच्या नियम व अटी काटेकोर आहेत. देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत परदेशी कंपन्यांना ढवळाढवळ करता येऊ नये, इंटरनेटच्या माध्यमातून महत्त्वाची गोपनीय माहिती मिळवता येऊ नये, यासाठी या अटी घालण्यात आल्या आहेत. या नियमांचा स्वीकार केल्यानंतर स्टारलिंकला परवानगीचं पत्र देण्यात आलं आहे. (Starlink in India)

अजून या बातमीची अधिकृत घोषणा भारत सरकारकडून (Government of India) झालेली नाही. पण, दळणवळण राज्यमंत्री चंद्रशेखर पेन्नासामी (Chandra Sekhar Pemmasani) यांनी गेल्या आठवड्यातच परवाना देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचल्याचं सांगितलं होतं. स्टारलिंकला जीएमपीसीएस, व्हीसॅट आणि आयएसपी हे तीन परवाने मिळणार आहेत. भारतात सध्या वनवेब, युटेलसॅट आणि जिओ एसईएस या उपग्रह इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या खाजगी कंपन्या आहेत. त्यात आता स्टारलिंकचं नाव जोडलं जाणार आहे. (Starlink in India)

(हेही वाचा – Operation Sindoor : कंदाहार विमान अपहरण प्रकरणातील दहशतवादी रौफ असगरचा खात्मा !)

त्याबरोबरच ॲमेझॉनच्या क्युपर सेवेसाठीही भारताकडे परवान्याचा प्रस्ताव आला आहे. पण, त्यांना अजून परवानगी देण्यात आलेली नाही. जागतिक स्तरावर उपग्रह इंटरनेट सेवेच्या बाबतीत स्टारलिंकने मोठी मुसंडी मारली आहे. कंपनीचे ६,७५० उपग्रह सध्या अवकाशात आहेत. त्यांच्या माध्यमातून वेगवान आणि अखंड इंटरनेट सेवा पुरवण्याची त्यांची क्षमता आहे. सध्या भारतात भारती एअरटेल (Airtel) आणि जिओ (Jio) या कंपन्या स्टारलिंक इंटरनेट सेवेचं वितरण करतात.

अर्थात, उपग्रह इंटरनेट असल्यामुळे अजूनही त्याचे दर चढे आहेत. त्यामुळे इतक्या लवकर ही सेवा व्यावसायिक वापरासाठी भारतात रुळणार नाही, असं तज्जांचं म्हणणं आहे. खासकरून ग्रामीण भागात या सेवेला फारसा उठाव सध्या नसेल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.