St News : एसटीच्या सर्व आगारातून वाहतूक सुरू; दिवाळीसाठी जादा गाड्या सोडणार

एसटी महामंडळाच्यावतीने होळी, गणेशोत्सव, दसरा-दिवाळी आदी सण-उत्सवाच्या काळात जादा वाहतूक चालवली जाते.

103
St News : एसटीच्या सर्व आगारातून वाहतूक सुरू; दिवाळीसाठी जादा गाड्या सोडणार
St News : एसटीच्या सर्व आगारातून वाहतूक सुरू; दिवाळीसाठी जादा गाड्या सोडणार

मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी एसटीचे नुकसान होऊ नये या कारणास्तव एसटी सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र आता मनोज जरांगेनी उपोषण मागे घेतल्याने एसटी सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. (St News)

मराठा आरक्षणावरून होत असलेल्या हिंसक आंदोलाना नंतर आता एसटी बस सेवा बंद करण्यात आली होती. दरम्यान याचा फटका प्रवाशांना बसला. विशेष म्हणजे सणासुदीचा काळ असल्याने अनेकजण जण गावाकडे जात असतात. मात्र, बसच बंद असल्याने गावाकडे कसे जावं असा प्रश्न प्रवाशांना बसत होता. तर खाजगी वाहन धारकांकडून अधिक पैसे घेतले जात असल्याने प्रवाशांना याच आर्थिक फटका बसत होता. राज्यभरात शालेय विद्यार्थ्यांच्या सहामाही परीक्षा सुरु असल्याने शालेय फेऱ्यांना एसटीकडून प्राधान्य देण्यात आलंय. येत्या ९नोव्हेंबरपासून एसटीची दिवाळी जादा वाहतूक सुरु होणार आहे.सणासुदीला गर्दीचा फायदा घेत खासगी बसचालक प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे उकळले जाते.दिवाळीमध्ये बसेसअभावी प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही एसटीच्या बसेस सोडण्यात येणार आहेत. विविध मार्गांवर या बसेस धावणार असून जादा बसेस ९ नोव्हेंबरपासून सुटणार आहेत.

(हेही वाचा :Exam Paper Leak : मुंबई विद्यापीठाचा पुन्हा भोंगळ कारभार; प्रश्नपत्रिका आणि उत्तरे परीक्षेपूर्वीच आली whatsapp वर)

एसटी महामंडळाच्यावतीने होळी, गणेशोत्सव, दसरा-दिवाळी आदी सण-उत्सवाच्या काळात जादा वाहतूक चालवली जाते. या दरम्यान, एसटीला अधिक उत्पन्न मिळवण्याची संधी असते. दिवाळीच्या सुट्टीत महाविद्यालये व शाळांना सुट्टी असते. त्यामुळे अनेक कुटुंबे मुलांसह गावी, धार्मिक स्थळे किंवा पर्यटनस्थळांना भेटी देण्याचे नियोजन करतात. तर नोकरीनिमित्त बाहेर असणारे कर्मचारीही या सणात आपल्या घरी जात असतात. अशावेळी हे सर्व प्रवाशी एसटीला प्राधान्य देतात.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.