-
प्रतिनिधी
एसटी (ST) महामंडळातील विना अपघात सेवा बजावणाऱ्या चालकांचा राष्ट्रीय सणांच्या दिवशी रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ते एसटी महामंडळाच्या ३०७ व्या संचालक मंडळाच्या बैठकीत बोलत होते. या बैठकीस डॉ. माधव कुसेकर, ह. पि. तुम्मोड, डॉ. सुमंत देऊलकर यांच्यासह सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.
(हेही वाचा – Operation Sindoor : पहलगाम हिंदू नरसंहाराचे राष्ट्राने घातले श्राद्ध; रणजित सावरकर यांची भावना)
मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, वर्षभरात २६० दिवस विना अपघात सेवा देणाऱ्या चालकांचा १५ ऑगस्ट, २६ जानेवारी व १ मे रोजी गौरव केला जाईल. तसेच सलग ५, १०, १५ व २० वर्षे अपघातविरहित सेवा बजावणाऱ्यांनाही रोख बक्षिसाद्वारे सन्मानित करण्यात येणार आहे. बैठकीत एसटीच्या (ST) सुविधा वाढवण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. प्रवाशांच्या सोयीसाठी राज्यातील २०४ बसस्थानकांवर एटीएम सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे.
(हेही वाचा – India-Pakistan Border वरील तणाव वाढला; पंतप्रधान मोदींच्या सूचनेनंतर राजनाथ सिंह सीमेकडे रवाना)
तसेच, एसटी (ST) महामंडळाने नव्या ३ हजार बसेस खरेदीस मान्यता दिली असून या बसेसमध्ये ३ बाय २ अशी आसन व्यवस्था राहणार आहे, ज्यामुळे दर बसमध्ये १५ ते १७ प्रवाशांची वाढ होणार आहे. याशिवाय १०० मिडी बसेस खरेदी करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. या बसेस डोंगराळ, दुर्गम भागांमध्ये धावणार असून, आदिवासी पाड्यांपर्यंतही एसटी सेवा पोहचवली जाणार आहे. “एसटीची सेवा आता ‘शेड्युल ट्राईब’ लोकांपर्यंत पोहचवण्याचा निर्धार आम्ही केला आहे,” असे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community