SSC Exam Result : दहावी परीक्षेतील गुणवंतांचा अतिरिक्त आयुक्तांच्या हस्ते सत्कार

48
SSC Exam Result : दहावी परीक्षेतील गुणवंतांचा अतिरिक्त आयुक्तांच्या हस्ते सत्कार
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने मार्च २०२५ मध्ये घेतलेल्या शालांत माध्यमिक म्हणजेच दहावीच्या (एसएससी) परीक्षेत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २४८ माध्यमिक शाळांमधून सर्वाधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना महानगरपालिका मुख्यालयात अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांनी १४ मे २०२५ रोजी गौरव केला तसेच पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. महानगरपालिका मुख्यालयात झालेल्या या छोटेखानी समारंभास उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ आणि शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुजाता खरे आदींसह मुख्याध्यापक, शिक्षक आणि यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. (SSC Exam Result)

(हेही वाचा – Gold Smuggling साठी सीआयएसएफ जवानांचा वापर; दोघांना अटक)

अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांनी यशवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या ध्येयाबाबत चर्चा केली. विद्यार्थ्यांनी या मुक्त संवादात आपण भविष्यात कोणता शैक्षणिक मार्ग निवडणार याबाबत सांगितले. या सर्व विद्यार्थ्यांना डॉ. सैनी यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर डॉ. सैनी यांनी स्वत:चा शैक्षणिक आणि प्रशासकीय प्रवासही उलगडून दाखविला. महानगरपालिका शिक्षण विभागाने परीक्षेसाठी जी तयारी करून घेतली, त्याबाबत विद्यार्थ्यांनी माहिती दिली. ‘मिशन मेरिट’ सराव पुस्तिका, परीक्षेचा सराव होण्याकरिता शिक्षणमंडळाच्या धर्तीवर शालेय स्तरावर सोडविण्यात आलेल्या सराव प्रश्नपत्रिकांचीही मोलाची मदत झाली, असे गुणवंत विद्यार्थ्यांनी आवर्जून सांगितले. (SSC Exam Result)

New Project 2025 05 14T185838.162

(हेही वाचा – IPL 2025 : आयपीएलच्या नवीन वेळापत्रकाचा आंतरराष्ट्रीय कार्यक्रमावर होईल ‘हा’ परिणाम)

यशवंत विद्यार्थ्यांमध्ये वरळी सी फेस महानगरपालिका माध्यमिक शाळेमधील अक्षरा अजय वर्मा (९६.८० टक्के), गजधर पार्क माणेकजी माध्यमिक शाळेची नंदिनी शगुनलाल यादव (९६.२० टक्के), गुंदवली मुंबई पब्लिक स्कूल माध्यमिक शाळेतील सेजल शेर बहादूर यादव (९५.६० टक्के), धारावी टी. सी. विनाअनुदानित माध्यमिक शाळेतील अकिब हारुन अन्सारी (९५ टक्के) आणि सीताराम मिल मुंबई पब्लिक स्कूलमधील श्रावणी दीपक सावंत (९५ टक्के) यांचा समावेश होता. तसेच के पूर्व विभागातील मुंबई पब्लिक स्कूल पूनम नगर या सीबीएसई मंडळाच्या इयत्ता दहावीतील मिशबाह फारुखी (९१ टक्के), भाग्येश साटम (८९.६ टक्के), आराध्य पाटील (८९.४ टक्के), कीर्ती मौर्या (८९.४ टक्के) आणि निखिल यादव (८९.२ टक्के) यांचा देखील समावेश होता. सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये पहिल्या पाच क्रमांकावर मुलींनी बाजी मारली आहे. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २४८ माध्यमिक शाळांमधून एकूण १४ हजार ९६६ एवढे विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १३ हजार ९०७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, सरासरी निकाल ९२.९२ टक्के इतका लागला आहे. (SSC Exam Result)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.