Soumya Swaminathan :   ‘सद्यस्थितीस कोरोनाचा धोका वाढतो आहे ही बाब खरी, पण…’; ‘WHO’च्या माजी शास्त्रज्ञांचं महत्त्वाचं भाष्य 

Soumya Swaminathan : जगभरात करोनाचा धोका वाढत असताना आता जागतिक आरोग्य संघटने(डब्ल्यूएचओ)च्या माजी शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन(Soumya Swaminathan) यांनी महत्त्वाचे भाष्य केले आहे. सौम्या स्वामीनाथन(Soumya Swaminathan) यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कोरोनाच्या सद्यस्थितीवर भाष्य केले आहे.

134

Soumya Swaminathan : जगभरात करोनाचा धोका वाढत असताना आता जागतिक आरोग्य संघटने(डब्ल्यूएचओ)च्या माजी शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन(Soumya Swaminathan) यांनी महत्त्वाचे भाष्य केले आहे. सौम्या स्वामीनाथन(Soumya Swaminathan) यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कोरोनाच्या सद्यस्थितीवर भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या, सध्या करोनाचा धोका वाढतो आहे, ही बाब खरी असली तरी कुठल्याही चितेंची आवश्यकता नाही. तसेच, २०२०मध्ये जी स्थिती आली होती, ती परिस्थिती आता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.(Soumya Swaminathan)

दरम्यान, केंद्रीय आरोग्य व कुटुंब मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सद्यस्थितीस देशभरात ४ हजारांवर कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या पोहोचली आहे. अशातच आता दिलासादायक माहिती समोर आली असून WHO च्या माजी शास्त्रज्ञ सौम्या स्वामिनाथन यांनी आता कोरोनाबाबत आणि त्याच्या व्हेरिएंटबाबत स्पष्ट केले. विशेष म्हणजे अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूच्या नवीन व्हेरिएंटमुळे पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. तसेच, देशातही सतर्कता बाळगण्यात येत असून महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि ठाण्यातही कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.

WHOच्या माजी शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन(Soumya Swaminathan) काय म्हणाल्या? 

 

भारतातील एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत WHOच्या माजी शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन(Soumya Swaminathan) यांनी कोरोनाच्या सद्यस्थितीवर भाष्य केले. त्यांनी मुलाखतीत बोलताना सांगितले की, Covid, SARS-CoV 2 हे विषाणूचे व्हेरिएंट आहेत. मात्र, या विषाणूचा व्हेरिएंट आता तसा सामान्य आहे. करोनाचा विषाणू म्युटेट म्हणजेच त्यात सातत्याने बदल होतो आहे. आता करोना व्हायरला पाच वर्षे झाली आहेत. त्यानंतर आता नियमित श्वसन विकारांप्रमाणेच हा विषाणू असणार आहे. त्यात घाबरण्यासारखं काहीही नाही, असेही सौम्या स्वामिनाथन म्हणाल्या.(Soumya Swaminathan)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.