पेडणेकरवाडीच्या तप्त माळरानावर Solar Energy ची हिरवी उमेद; पाण्याचा झरा अखेर सुरू!

43
पेडणेकरवाडीच्या तप्त माळरानावर Solar Energy ची हिरवी उमेद; पाण्याचा झरा अखेर सुरू!
  • प्रतिनिधी 

दापोली तालुक्यातील पेडणेकरवाडीतील गावकऱ्यांच्या दीर्घकाळच्या प्रतीक्षेला अखेर पुर्णविराम मिळाला आहे. राज्यातील पहिले सौरऊर्जा (Solar Energy) आधारित पाणीपुरवठा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण करत गावाने आपल्या भविष्यातील विकासाची नवी दिशा निश्चित केली आहे. हे यश शक्य झाले ते राज्यमंत्री योगेश कदम यांच्या दूरदृष्टीतून आणि गावकऱ्यांच्या अखंड पाठपुराव्यामुळे.

सौरऊर्जेच्या किरणांतून उजळली आशा

पेडणेकरवाडी येथे ५ लाख रुपये खर्चून सौरऊर्जा (Solar Energy) आधारित सार्वजनिक नळपाणी योजना पूर्ण करण्यात आली आहे. हा प्रकल्प दापोली व मंडणगड तालुक्यांसाठीच नव्हे, तर राज्यातील इतर ग्रामीण भागांसाठीही आदर्श ठरतो आहे. गेल्या २०-३० वर्षांपासूनच्या भीषण पाणीटंचाईच्या समस्येवर या प्रकल्पामुळे कायमचा उपाय सापडला असून, गावकऱ्यांना आता स्वच्छ व सातत्यपूर्ण पाण्याचा पुरवठा मिळू लागला आहे. पारंपरिक वीजपुरवठ्यावरची अवलंबनता कमी करत, गावाने शाश्वत व पर्यावरणपूरक पर्यायाची कास धरली आहे.

New Project 2025 05 15T203958.034

(हेही वाचा – अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा जवळचा सहकारी Tariq Parveen ची जामिनावर सुटका)

बंधाऱ्यामुळे शेतीला नवसंजीवनी

पाण्याचा फक्त घरापुरता वापर नाही, तर शेतीसाठीही जलस्रोत उपलब्ध व्हावा यासाठी पेडणेकरवाडी चांभारटाक येथे २० लाख रुपये खर्चून बंधाऱ्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्यामुळे पाण्याची साठवणूक वाढून, शेती क्षेत्रालाही नवसंजीवनी मिळणार आहे.

राज्यमंत्री योगेश कदम यांचे प्रेरणादायी नेतृत्व

“हा प्रकल्प फक्त पाणीपुरवठ्यापुरता मर्यादित नसून, स्वयंपूर्ण गावाकडे नेणारे हे ठोस पाऊल आहे. ग्रामस्थांच्या समर्पित पाठपुराव्यामुळे आणि नवतरुण मित्र मंडळाच्या कार्यक्षम नेतृत्वामुळे हे शक्य झाले,” असे सांगत राज्यमंत्री योगेश कदम यांनी गावकऱ्यांना आश्वासन दिले की, अशा उपक्रमांना सरकारकडून आणखी गती दिली जाईल.

New Project 2025 05 15T204034.122

(हेही वाचा – Indian Army Eastern Command : मणिपूरमधील चांदेल येथे आसाम रायफल्सने केलेल्या कारवाईत १० बंडखोर ठार)

स्वयंपूर्ण गाव – समर्थ महाराष्ट्र

पेडणेकरवाडीतील या यशस्वी प्रकल्पाने हे सिद्ध केले आहे की इच्छाशक्ती, प्रभावी नेतृत्व आणि जनसहभाग यांच्या समन्वयातून कोणतेही गाव प्रगतीच्या मार्गावर झपाट्याने वाटचाल करू शकते. राज्य सरकार अशा पायाभूत सुविधांना सातत्याने प्रोत्साहन देणार असून, “गावाचा विकास म्हणजे राज्याचा विकास,” हा मंत्र मंत्र्यांनी अधोरेखित केला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.