Solapur : सयाजीराजे पार्कमध्ये पाळणा तुटला ; प्रसिद्ध LIC उद्योजकाचा मृत्यू

Solapur : सयाजीराजे पार्कमध्ये पाळणा तुटला ; प्रसिद्ध LIC उद्योजकाचा मृत्यू

89
Solapur : सयाजीराजे पार्कमध्ये पाळणा तुटला ; प्रसिद्ध LIC उद्योजकाचा मृत्यू
Solapur : सयाजीराजे पार्कमध्ये पाळणा तुटला ; प्रसिद्ध LIC उद्योजकाचा मृत्यू

सोलापूर (Solapur) जिल्ह्याच्या अकलूज येथील सयाजीराजे वॉटर पार्कमध्ये पाळणा तुटल्याने एका प्रसिद्ध LIC उद्योजकाचा मृत्यू झाला आहे. पार्कमधील फिरता पाळणा उंचावरुन खाली पडून त्यामधील चार जण गंभीररित्या जखमी झाले होते. प्रसिद्ध युवा उद्योजक तुषार धुमाळ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. (Solapur)

हेही वाचा-Drain Water : मातोश्रीच्या परिसरातील पाण्याचा निचरा करण्यासाठी वर्षाला सहा कोटींचा खर्च

तुषार धुमाळ आणि त्यांचे तीन मित्र बुधवारी या पार्कमध्ये गेले होते. ते एका राईडमध्ये बसले होते. या राईडचा वेग वाढल्यानंतर तुषार धुमाळ यांचा पाळणा अचानक खाली कोसळला. हा पाळणा उंचावरुन खाली पडल्यामुळे आतमध्ये बसलेले तुषार धुमाळ आणि त्यांच्या मित्रांना जबर दुखापत झाली. तुषार धुमाळ यांच्या डोक्याला जबर मार लागला. प्रचंड रक्तस्राव झाल्याने त्यांचा लगेच मृत्यू झाला. (Solapur)

हेही वाचा- गेट वे ऑफ इंडिया आणि बधवार पार्कमधील समुद्री कचरा काढण्यासाठी BMC प्रायोगिक तत्वावर करणार रिमोट बोटींचा वापर

हा अपघात नेमका कसा घडला, कोणत्या कारणामुळे पाळणा तुटून खाली पडला, याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, पोलिसांकडून या घटनेची चौकशी सुरु असून तपासातून लवकरच खरी माहिती समोर येईल. (Solapur)

हेही वाचा- Maruti Chitampalli : पद्मश्री पुरस्कार विजेते मारुती चित्तमपल्ली यांचे निधन ; वयाच्या 93 वर्षी घेतला अखेरचा श्वास

तुषार धुमाळ हे पुणे जिल्ह्यातील भिगवणचे प्रसिद्ध एलआयसी उद्योजक होते. एलआयसी वर्तुळात त्यांचे मोठे प्रस्थ होते. अल्पावधीतच त्यांनी भिगवण आणि आजुबाजूच्या परिसरातील उद्योग वर्तुळात मोठे नाव कमावले होते. त्यांच्या मृत्यूमुळे भिगवण परिसरात खळबळ उडाली आहे. (Solapur)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.