Indrayani River मध्ये दररोज सहा अब्ज लिटर दूषित पाणी; MPCB ने राष्ट्रीय हरित लवादाला दिली माहिती

93
Indrayani River मध्ये दररोज सहा अब्ज लिटर दूषित पाणी; MPCB ने राष्ट्रीय हरित लवादाला दिली माहिती

पिंपरी-चिंचवड महापालिकेसह सात विविध आस्थापनांकडून सहा अब्ज २० लाख लिटर प्रदूषित सांडपाणी रोज इंद्रायणी नदीत सोडले जाते, अशी माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) राष्ट्रीय हरित लवादाला दिली. (Indrayani River)

तुळापूर येथे इंद्रायणी नदीचा (Indrayani River) भीमेशी संगम होतो. त्यामुळे हे सांडपाणी भीमेत मिसळते. तिथे गटारात रूपांतर झालेल्या भीमेचे पाणी पुढे उजनी धरणात पोचते. उजनी धरणातील पाणी सोलापूर, बार्शीसह जिल्ह्यातील अनेक गावांना पिण्यासाठी पुरवले जाते. इंद्रायणी नदीत सतत मिसळत असलेल्या प्रदूषित, प्रक्रिया न केलेल्या, घातक रासायनिक सांडपाण्याबाबत राष्ट्रीय हरित लवादापुढे सुनावणी सुरू आहे. प्रदूषण नियंत्रणाचे काम असलेल्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानेच लवादाकडे दिली. (Indrayani River)

(हेही वाचा – Pune Porsche Car Accident : ‘बाळा’चे वडील आणि आजोबांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी)

गेल्या काही महिन्यांमध्ये नदीत विषारी फेस, प्रदूषित पाण्याचे प्रमाण खूप वाढले होते. राष्ट्रीय हरित लवादाने मार्च महिन्यात स्वतःहून या प्रकाराची दखल घेतली होती. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानंतर (MPCB) आता पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, जिल्हाधिकारी अशा सगळ्यांना याप्रकरणी उत्तर द्यावे लागणार आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी सप्टेंबर महिन्यात होणार आहे. (Indrayani River)

इंद्रायणीत मिसळणाऱ्या प्रक्रियारहित रासायनिक सांडपाण्याचे परिणाम सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना भोगावे लागतात. जलशुद्धीकरणाच्या प्रक्रियेत गडबड झाल्यास आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. (Indrayani River)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.