Sion Railway Flyover : सायन रेल्वे उड्डाणपूल तोडणार, वाहतूक पोलिसांना माहीतच नाही

२९ फेब्रुवारी रोजी या पुलाचे बांधकाम तोडण्यात येणार असल्यामुळे येथील वाहतुकीच्या नियोजनाबाबत वाहतूक पोलिसांकडून अद्याप कुठलीही सूचना देण्यात आलेली नसल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

176
Sion Railway Flyover : सायन रेल्वे उड्डाणपूल तोडणार, वाहतूक पोलिसांना माहीतच नाही
Sion Railway Flyover : सायन रेल्वे उड्डाणपूल तोडणार, वाहतूक पोलिसांना माहीतच नाही

सायन येथील पूर्व पश्चिमेला जोडणारा रेल्वे उड्डाणपूल येत्या २९ फेब्रुवारी रोजी तोडण्याचे मध्य रेल्वेकडून निश्चित करण्यात आले असले तरी याबाबत अद्याप मुंबई वाहतूक विभागाला कुठलीही सूचना देण्यात आलेली नसल्यामुळे पुलावरून जाणारी वाहतुक कशी वळवणार याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. (Sion Railway Flyover)

सायन रेल्वे स्थानकाजवळच ब्रिटिशकालीन असलेला उड्डाणपूल पुनर्बांधणीसाठी २९ फेब्रुवारी रोजी पाडण्यात येणार असल्याचे मध्यरेल्वे कडून निश्चित करण्यात आले आहे.परंतु याबाबत मुंबई वाहतूक पोलिसांना याबाबत मध्य रेल्वेकडून कळविण्यात आलेले नसल्याची माहिती वाहतूक विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. याबाबत मुंबई वाहतूक( मध्य)विभागाचे पोलीस उपायुक्त समाधान पवार यांच्याकडे चौकशी केली असता मी ३ दिवसांपूर्वी वाहतूक विभागाचा पदभार स्वीकारला असून माझ्याकडे याबाबत अद्याप कुठलेही पत्रक किंवा सूचना आलेली नसल्याची माहिती पवार यांनी दिली. २९ फेब्रुवारी रोजी या पुलाचे बांधकाम तोडण्यात येणार असल्यामुळे येथील वाहतुकीच्या नियोजनाबाबत वाहतूक पोलिसांकडून अद्याप कुठलीही सूचना देण्यात आलेली नसल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. (Sion Railway Flyover)

(हेही वाचा – Mulund Skywalk : मुलुंड महाराणा प्रताप चौकातील भुयारी मार्गाचा प्रस्ताव गुंडाळला)

२० जानेवारी रोजी पूल तोडण्याचे नियोजन पुढे लोटले ….

यापूर्वी २० जानेवारी रोजी या पुलाचे बांधकाम तोडण्यात येणार होते. मध्य रेल्वेला मुंबई वाहतूक पोलिसांकडून पुनर्बांधणीसाठी मंजुरी मिळाली होती. वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीचे नियोजन देखील करण्यात आले होते, वाहतूक पोलिसांकडून अधिकृत पत्रक काढून या पुलावरून जाणारी वाहतुकीचा मार्ग निश्चित करण्यात आला होता.पूल बंद झाल्यावर पर्यायी मार्ग म्हणून चेंबूर आणि कुर्ला येथील इस्टर्न एक्सप्रेस हायवेला एलबीएस रोड आणि कलिना यांना जोडणाऱ्या चेंबूर सांताक्रूझ लिंक रोड,एलबीएस रोडवरून दक्षिणेकडे सायनकडे जा आणि टी-जंक्शन आणि नंतर वांद्रे येथील कलानगरकडे जाण्यासाठी माहीम नेचर पार्क रोड, ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे आणि सायन-ट्रॉम्बे रोडने ठाण्याहून येणारी वाहतुक बीकेसी-चुन्नाभाटी कनेक्टर या मार्गाने वळविण्यात आली होती आणि सीएसएमटी आणि भायखळा येथून येणाऱ्यांनी धारावीला जाण्यासाठी सायन हॉस्पिटलजवळील ६० फूट रस्ता धारावी, तेथून ते टी-जंक्शन मार्गे वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वळविण्यात आली होती. मात्र, स्थानिक रहिवाशांचा विरोध आणि खासदार राहुल शेवाळे यांच्या मध्यस्थीनंतर २० जानेवारी रोजी ते पाडण्यात येणाऱ्या पुलाचे पाडकाम पुढे लोटण्यात आले होते. (Sion Railway Flyover)

मध्य रेल्वेने या पुलाचे बांधकाम पाडण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण करून २९ फेब्रुवारी रोजी हा पूल पाडण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला असला तरी अद्याप याबाबत वाहतूक पोलिसांना कुठलीही सूचना देण्यात आलेली नसल्याचे समजते. पुलाच्या जीर्ण अवस्थेमुळे हा पूलाची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे, रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “या पुलाची पुनर्बांधणी २४ महिन्यांत म्हणजे जानेवारी २०२६ पर्यंत केली जाईल.”धारावी, एलबीएस रोड आणि ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे यांना जोडणारा रेल्वे उड्डाणपूल बांधला जात आहे जेणेकरून मध्य रेल्वेवर सीएसएमटी आणि कुर्ला दरम्यान पाचव्या आणि सहाव्या लाईन टाकण्यासाठी अधिक जागा मिळू शकेल. (Sion Railway Flyover)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.