सिंहगडावर पीएमपीसाठी उभारले ‘चार्जिंग स्टेशन

94

‘पीएमपीकडून सिंहगडावर ई-बससाठी चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले असून, 200 केव्ही (किलोवॅट) ट्रान्सफॉर्मर येथे नुकताच बसवण्यात आला आहे. त्यामुळे आता लवकरच खासगी वाहनांना सिंहगडावर बंदी केली जाण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसांत येथील चार्जिंग स्टेशनचेही उद्घाटन होणार आहे.

सिंहगडावर युद्धपातळीवर काम सुरु

सिंहगडावर खासगी वाहनांमुळे प्रदूषण व वाहनकोंडी होते. त्यामुळे किल्ल्यावर खासगी वाहनांना बंदी करण्यात यावी, अशी मागणी होत होती. याबाबत वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी याची तत्काळ दखल घेतली. येथील खासगी वाहतूक बंद करून ग्रीन एनर्जीद्वारे पर्यटकांना वाहतूक पुरवण्याचे आदेश दिले. त्यानुसार प्रशासनाकडून सिंहगडावर आता पीएमपीच्या लहान 9 मीटर लांबीच्या ई-बसकडून सेवा पुरवण्यात येणार आहे. त्यासाठी वनविभाग आणि पीएमपीकडून सिंहगडावर युद्धपातळीवर काम सुरू आहे. येथील जागा आता बस पार्किंगसाठी पीएमपीच्या ताब्यात आली आहे. तसेच येथे पीएमपीच्या विद्युत विभागाने 200 केव्हीचा स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर व बसगाड्यांसाठी एक चार्जिंग स्टेशनही उभारले आहे.

( हेही वाचा: मेहुण्याच्या कंपनीत ‘मनी लाँड्रिंग’, तुमचे संबंध काय? सोमय्यांचा उद्धव ठाकरेंना सवाल )

वन विभागाच्या मदतीने काम सुरु

सिंहगडावर पीएमपीची ई-बस सेवा सुरू करण्याची तयारी युद्धपातळीवर सुरू असून, वन विभागाच्या मदतीने सर्व काम सुरू आहे. येथे नुकतेच एक चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले असून, त्याला विद्युतपुरवठा करण्यासाठी येथे ‘ट्रान्सफॉर्मर’ देखील बसवण्यात आला आहे. येथील इतरही कामे तातडीने सुरू आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.