देवनार आणि कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्यात मापात पाप! आता BMC बसवणार वजनकाटा

57
देवनार आणि कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्यात मापात पाप! आता BMC बसवणार वजनकाटा
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई 

मुंबई महापालिकेच्या कचऱ्या विल्हेवाट लावण्यात येणाऱ्या कांजूरमार्ग आणि देवनार डम्पिंग ग्राऊंडवर वाहनातून येणाऱ्या कचऱ्याचे वजन मोजण्यासाठी वजनकाटे खासगी कंपनीकडून बसवण्यात आले असले तरी आता या दोन्ही ठिकाणी महापालिकेच्यावतीने वजनकाटे बसवण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी येणाऱ्या कॉम्पॅक्टरमधील कचऱ्याचे वजन खासगी वजन काट्यावर केल्यानंतर महापालिकेच्या वजनकाट्यावरही केले जाणार आहे. ज्यामुळे मुंबईतून उचण्यात येणाऱ्या कचऱ्यातील मापातील पाप शोधून नेमका किती कचरा डम्पिंग ग्राऊंडवर जातो याची अचूक माहिती समोर येणार आहे. (BMC)

मुंबईतील विविध विभागांतून महानगरपालिकेद्वारे नेमणूक केलेल्या कंत्राटदारांच्या व महानगरपालिकेच्या कॉम्पॅक्टरद्वारे उचलून कांजूरमार्ग येथील डम्पिंग ग्राऊंड आणि देवनार डम्पिंग ग्राऊंडवर येथे कचरा वाहून नेला जातो. कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडवर सुमारे ५९०० मेटीक टन आणि देवनार डम्पिंग ग्राऊंडवर सुमारे ६०० मेट्रिक टन एवढा कचरा टाकला जातो. सद्यस्थितीत कांजूरमार्ग घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया प्रकल्प येथे खासगी कंत्राटदार असलेल्या ऍन्टोनी लारा एनव्हायरोमेंट सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्यावतीने वजनकाटा बसवण्यात आला असून या वजनकाट्यांचा सहाय्याने कचऱ्याचे वजन केले जाते. तसेच देवनार डम्पिंग ग्राऊंडवरही वजन काटा बसवण्यात आला असून या दोन्ही डम्पिंग ग्राऊंडवरील वजन काट्याच्या माध्यमातून मुंबईतून कॉम्पॅक्टरद्वारे आणलेल्या कचऱ्याचे वजन केले जाते. (BMC)

(हेही वाचा – BMC : भटक्या कुत्र्यांना आणि मांजरींना खायला घालणाऱ्यांना रोखाल तर दाखल होईल गुन्हा; का ते वाचा)

मात्र, कांजूरमार्ग आणि डम्पिंग ग्राऊंड येथे वजनकाटे उपलब्ध असले तरीही महापालिकेच्यावतीने आता अत्याधुनिक पद्धतीचे वजनकाटे बसवण्यात येणार आहे. यासाठी सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या वजनकाट्याची उभारणी करण्यासाठी पाटील इलेक्ट्रिकल्सची नेमणूक करण्यात आली आहे. देवनार आणि कांजूरमार्ग येथील डम्पिंग ग्राऊंडवर खासगी कंपनीच्यावतीने वजनकाटा असला तरी भविष्यात महापालिकेच्यावतीने देण्यात येणाऱ्या नवीन कंत्राट कामांमध्ये कचऱ्याच्या कामाचे पैसे हे वजनावर आधारित असल्याने त्यासाठी पुरक वजनकाटे बसवण्याचा महापालिकेच्यावतीने निर्णय घेण्यात आला. (BMC)

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार दोन्ही डम्पिंग ग्राऊंडवर वजनकाट्यावरच कॉम्पॅक्टरमधील कचऱ्याची नोंद यापूर्वी घेतली जात होती. ती नोंद पुढेही या वजनकाट्यावर असेल. तसेच महापालिकेच्यावतीने स्वत:चे वजनकाटे बसवले जाणार असून त्याठिकाणी महापालिकेचे कर्मचारी कार्यरत राहतील. त्यामुळे या वजनकाट्याची उभारणी झाल्यानंतर खासगी वजनकाट्यावरील कचऱ्याचे वजन केल्यानंतर महापालिकेच्या वजनकाट्यावरही कचऱ्याचे मोजमाप केले जाणार आहे. त्यामुळे दोन्ही वजनकाट्यावरील कचऱ्याचे वजनामुळे अचूक मापन केले जाणार असल्याने भविष्यातील कंत्राट कामांमध्ये या वजनकाट्याच्या आधारे अचूक कचऱ्याचे मोजमाप केले जाईल, असे सांगितले. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.