Simhastha Kumbh Mela 2027: भाविकांसाठी आनंदाची बातमी; २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा झाल्या जाहीर  

93
Simhastha Kumbh Mela 2027: सिंहस्थ कुंभमेळ्यातील अमृतस्थानांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) रविवारी दोन वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासंदर्भातील बैठकीसाठी नाशिकमध्ये (Simhastha Kumbh Mela 2027 Nashik) असतानाच या तारखा जाहीर झाल्या आहेत. या सिंहस्थ मेळाव्यासंदर्भात काही मतभेद असले तरी ते सोडवण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या माध्यमातून करण्यासाठी रविवारी ०१ जून रोजी बैठक पार पडत असून त्याचदरम्यान अमृतस्नानाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. (Simhastha Kumbh Mela 2027)

(हेही वाचा – Ajit Pawar यांना धक्का! राष्ट्रवादीचे सात आमदार ‘या’ पक्षात झाले सामील)

त्र्यंबकेश्वरमधील अमृतस्थानच्या तारखा
अमृतस्थानच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. ते पुढीलप्रमाणे पाहुयात… 
पहिले अमृतस्नान – २ ऑगस्ट २०२७ 
द्वितीय अमृतस्नान – ३१ ऑगस्ट २०२७
तृतीय अमृतस्नान –  १२ सप्टेंबर २०२७
नाशिक कुंभ अमृतस्त्रान तारीखा 
३१ ऑक्टोबर २०२६ ध्वजारोहण करून कुंभ पर्वाला सुरुवात होईल.
पहिले अमृतस्नान २ ऑगस्ट २०२७
द्वितीय अमृतस्नान – ३१ ऑगस्ट २०२७
तृतीय अमृतस्नान – ११ सप्टेंबर २०२७

(हेही वाचा – राहुल गांधींची न्यायालयात अजब मागणी Rahul Gandhi)

बैठकीतील पाच महत्त्वाचे मुद्दे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा नियोजनाची बैठक घेत आहेत. यामध्ये देशातील सर्वच आखाड्यांचे साधू महंत आणि प्रशासन अधिकारी उपस्थित आहेत. रविवारी ०१ जून रोजी झालेल्या बैठकीमध्ये अमृत स्रानाच्या तारखा जाहीर करण्याबरोबरच नाशिकचा कुंभमेळा १३ महिन्यांऐवजी २२ महिने असणार असल्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. यामध्ये तीन मुख्य स्नान असून २५ ऐवजी ४२ पर्वस्त्रान असतील. चर्चेमध्ये त्र्यंबकेश्वरमधील साधूंची नाराजी हा कळीचा मुद्दा असणार आहे. रविवारच्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण पाच मुद्दे असणार आहेत.

(हेही वाचा – IDF : ‘आम्ही सर्व ओलिसांना परत करू, तुम्ही बॉम्बहल्ले थांबवा’; गाझा प्रमुख ठार झाल्यानंतर हमासची नरमाईची भूमिका)


नावावरुन मतभेद अन् सुवर्णमध्य…
सिंहस्थ कुंभमेळा हा खरा नाशिकचा की त्रंबकेश्वरचा (Trimbakeshwar) याबाबत त्र्यंबकेश्वरच्या शैव संप्रदायाने सवाल उपस्थित केले होते. वैष्णव आणि शैव संप्रदायातील वाद टाळण्यासाठी प्रशासनाने आता नाशिक आणि त्रंबकेश्वर ही दोन्ही नावं टाळून केवळ सिंहस्थ कुंभमेळा २०२७ असे संबोधन करणे सुरू केले आहे. या वादामुळे भाविकांच्या येण्यावर मोठा परिणाम झाला असता त्यातून श्रद्धा जाण्याची भीती होती. त्यामुळे सुवर्ण मध्य शोधत प्रशासनांन आता हा वाद सोडवला आहे. मात्र आजच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत शैव साधू बैठकीत साधू महंत याबाबत काय भूमिका घेत आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असं असतानाच कुंभमेळा नियोजन संदर्भात होणाऱ्या बैठकीत कुंभमेळ्यामध्ये होणाऱ्या अमृतस्नान तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.