
सिक्कीम (Sikkim Landslide) , आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरा यांसारख्या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दोन दिवसांत 30 हून अधिक मृत्यू झाले आहेत. गेले २ दिवस बचावकार्य सुरू आहे. रविवारी (१ जून२०२५) संध्याकाळी सिक्कीममधील (Sikkim Landslide) एका लष्करी छावणीत झालेल्या भूस्खलनात काही सैनिकांसह ३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे, तर ९ जवान बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. (Sikkim Landslide)
#UPDATE : Continuous heavy rainfall over the past few days has led to widespread landslides and flash floods across Sikkim, causing significant damage to infrastructure and posing serious risks to residents and tourists.
Sankalang Bridge Collapse: A section of the… pic.twitter.com/SnRls2Yj2T
— upuknews (@upuknews1) June 2, 2025
रविवारी संध्याकाळी ७ वाजता उत्तर सिक्कीममधील (Sikkim Landslide) चट्टन येथील लष्करी छावणीत भूस्खलन झाले. यामुळे आजूबाजूच्या परिसरात बांधलेल्या घरांचे मोठे नुकसान झाले. या भूस्खलनात तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक लोक बेपत्ता आहेत. मृतांची ओळख पटविण्यासाठी आणि बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी मोहीम रबवली जात आहे. (Sikkim Landslide)
💪 Mission Resilience | North Sikkim@BROindia restores one-way road access to Lachung after flash floods & landslides crippled the region.
🛣️ Safe evacuation of stranded tourists to begin from 02 June 2025.
Kudos to #ProjectSwastik for their unwavering commitment on the… pic.twitter.com/UTl7cHFsvr— Sikkim Media (@SikkimMedia) June 1, 2025
उत्तर सिक्कीममध्ये (Sikkim Landslide) मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, लोचन आणि लाचुंग भागात सुमारे १५०० पर्यटक अडकले आहेत. मंगन जिल्ह्याचे एसपी सोनम देचू भुतिया म्हणाले की, ११५ पर्यटक लाचेनमध्ये आणि १,३५० पर्यटक लाचुंगमध्ये राहत आहेत. भूस्खलनामुळे दोन्ही बाजूंनी रस्ते बंद करण्यात आले आहेत. सर्व पर्यटकांना सध्या त्यांच्या हॉटेलमध्येच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. (Sikkim Landslide)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community