शीख भारतीय सैन्याला पंजाबमधून आक्रमण करू देणार नाहीत; Khalistani Terrorist Pannun ची गरळओक

76

२ कोटी शीख पाकिस्तानसोबत दगडासारखे उभे आहेत. भारतीय सैन्याला पंजाबमधून (Punjab) पाकिस्तानवर आक्रमण करण्याची अनुमती दिली जाणार नाही, अशी धमकी अमेरिकापुरस्कृत खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू (Khalistani Terrorist Pannun) याने दिली. त्याने पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा यांना धमकी देतांना म्हटले की, ‘त्यांना इंदिरा गांधी यांच्यासारखे नशिब येऊ शकते.’ पन्नू याने पहलगाममधील (Pahalgam Terror Attack) आतंकवादी काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) अस्थिरता निर्माण करण्यासाठी आणि निवडणुकीत लाभ मिळवण्यासाठी भारताने रचलेले नाटक असल्याचा आरोप केला आहे.

(हेही वाचा – IPL Expansion : आणखी ३ वर्षांनी आयपीएलमध्ये ९४ सामने? संचालक धुमाळ यांनी दिले संकेत)

यावर देहलीतील भाजप सरकारचे मंत्री मनजिंदर सिंह सिरसा म्हणाले की, पन्नूने आधी स्वतःची मान वाचवावी, भारतातील शीख समुदायाला बदनाम करण्याचे त्याचे प्रयत्न फोल जाणार आहेत.

पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या आतंकवादी हल्ल्यानंतर भारत युद्धाची तयारी करत आहे, असे बोलले जात आहे. त्यावरून पन्नू याने भारत सरकारलाच आव्हान दिले आहे. पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांची हत्या त्यांचा धर्म विचारून करण्यात आली. या क्रूरतेनंतर जगभरातील देश भारताला पाठिंबा देत असून आतंकवादाच्या विरोधातील लढाईमध्ये सहकार्य करणार आहेत. (Khalistani Terrorist Pannun )

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.