‘Shri Datt Snacks’चा लोगो वापरून लाल मोहम्मद ही मुस्लिम व्यक्ती ग्राहकांची फसवणूक करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील रोहा तालुक्यातील खांब या ठिकाणी श्री साई दत्त स्नॅक्स या नावाने हॉटेल सुरू आहे. यामध्ये साई हे नाव अतिशय छोट्या अक्षरात लिहून हे हॉटेल ‘श्री दत्त स्नॅक्स’ असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अर्थात ग्राहकांची फसवणूक करण्यासाठी ही लबाडी केली गेलेली आहे. ‘श्री दत्त स्नॅक्स’ हे उपाहारगृह विशेषकरून उपवासाच्या पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे हिंदू मोठ्या विश्वासाने या उपाहारगृहात जातात. असे असताना या मुस्लिम व्यक्तीकडून शुद्धता आणि पावित्र्याला बाधा आणून हिंदूंची फसवणूक केली जात आहे.
पळस्पे फाटा येथील ‘श्री दत्त स्नॅक्स’ ओम प्रमाणित
फसवणूकीचा हा एक प्रकार नुकताच समोर आला असला तरी, अशाच प्रकारे अनेक ठिकाणी असे कृत्य केले जात आहे. नावाचा असा गैरवापर होत असल्याचे लक्षात आल्यानंतर आपल्याकडे वर्षानुवर्षे येणाऱ्या ग्राहकांची अशी फसवणूक होऊ नये यासाठी ‘श्री दत्त स्नॅक्स’ने आपल्या पळस्पे फाटा येथील उपहारगृहासाठी ओम प्रमाणपत्र घेतले आहे.
ग्राहकांनीही अशा बाबतीत थोडी सजगता दाखवण्याची आवश्यकता आहे. आपण ज्या ठिकाणी एखादी गोष्ट खरेदी करत आहोत, ते दुकान किंवा हॉटेल हे कोणाचे आहे, याची खात्री करून घ्यायला हवी. ग्राहकांना हे सोपे जावे यासाठीच ओम प्रतिष्ठानच्या माध्यमातून ओम प्रमाणपत्राची संकल्पना राबवण्यात येत आहे. यामध्ये प्रमाणपत्रावरील क्युआर कोड स्कॅन केला की, त्या दुकानाची सगळी माहिती ग्राहकाला बघता येणार आहे. Shri Datt Snacks
‘ओम प्रमाणपत्रा’ची संकल्पना
सध्या भारतीय बाजारपेठेत हलाल प्रमाणित उत्पादनांचे स्तोम माजले आहे. या माध्यमातून भारतात इस्लामची स्वतंत्र अर्थव्यवस्था उभी राहिली आहे. या हलाल अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून हिंदूंकडून पैसा कमावून तो दहशतवादी कारवायांसाठी वापरला जात आहे. हे हिंदूंसाठी पर्यायाने राष्ट्रासाठी धोक्याचे बनले आहे म्हणूनच ‘हिंदूंपासून हिंदूंपर्यंत’ असे ब्रीद असलेली अर्थात हिंदूंचा पैसा हिंदूंकडेच जावा यासाठी ‘ओम प्रमाणपत्रा’ची संकल्पना मांडण्यात आली.(Shri Datt Snacks)