Bihar : बिहारमध्ये श्री मारुतीच्या मूर्तीची तोडफोड; राज्यात दंगलसदृश्य स्थिती 

254

बिहारमधील (Bihar) कटिहार जिल्ह्यात दोन ठिकाणी श्री हनुमानाच्या पुतळ्याची तोडफोड करून जातीय वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनांमुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली. दोषींची ओळख पटवून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी लोकांनी केली आणि या संदर्भात मोठ्या प्रमाणात निदर्शनेही केली. त्याचबरोबर बिहारमधील बड्या नेत्यांनीही याची दखल घेतली आहे.

पोलिसांनी गुन्हा नोंदवला 

कटिहारमधील मनिहारी  (Bihar)  पोलीस ठाण्याच्या परिसरात श्री हनुमानाच्या मूर्तीची तोडफोड करण्याच्या घटना घडल्या. एक घटना मणिहारी पोलीस ठाण्यांतर्गत जगवती गावात घडली, तर दुसरी घटना महियारपूर रेल्वे स्थानकात बसवलेल्या मूर्तीसोबत घडली. दोन्ही ठिकाणी समाजकंटकांनी श्री हनुमानाच्या पुतळ्याची तोडफोड केली. ही घटना मंगळवार, 23 जानेवारी 2024 रोजी रात्री घडली. दुसऱ्या दिवशी जेव्हा लोकांनी श्री हनुमंताच्या मूर्तीची तोडफोड झाल्याचे पाहिले तेव्हा त्यांनी विरोध करण्यास सुरुवात केली. संतप्त जमावाने रेल्वे ट्रॅक आणि महामार्ग रोखून धरले. मूर्ती फोडणाऱ्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी संतप्त नागरिकांकडून करण्यात येत होती. या घटनेनंतर संतप्त जमावाला शांत करण्यासाठी दोन्ही घटनास्थळी मोठ्या प्रमाणा Bihar पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला. अखेर तासाभराच्या अथक परिश्रमानंतर पोलिसांनी लोकांना शांत करून परत पाठवले. यानंतर गाड्या आणि वाहनांची वाहतूक सुरू झाली. ग्रामस्थांची समजूत काढण्यासाठी परिसरातील एसडीएम यांनी समिती स्थापन केली आहे. हे समिती धार्मिक स्थळांच्या सुरक्षेवर काम करणार आहे. पुतळ्यांची तोडफोड करणाऱ्यांना तीन दिवसांत अटक करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. या घटनेबाबत पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.