-
प्रतिनिधी
मुंबईतील नालेसफाईच्या कामावर AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) तंत्रज्ञानाने गंभीर शंका उपस्थित केल्या असून तब्बल 40% फेरफार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ही धक्कादायक माहिती शुक्रवारी उपनगर पालकमंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या समोर उघड झाली. त्यांनी यावर तातडीने महानगरपालिका आयुक्तांना चौकशीचे आणि कारवाईचे स्पष्ट आदेश दिले.
AI विश्लेषणातून उघड!
AI च्या माध्यमातून नालेसफाईच्या ट्रकांद्वारे नेण्यात येणाऱ्या गाळाचे विश्लेषण करण्यात आले. सुमारे 40,000 पेक्षा अधिक फेऱ्यांपैकी 17,000 फेऱ्यांमध्ये गाळाच्या नोंदीत मोठा फरक दिसून आला. गाळ कमी, जास्त, माती किंवा डेब्रिजच्या स्वरूपात असू शकतो. काही ठिकाणी गाळ अजूनही नाल्यांमध्येच असल्याचे AI ने दाखवून दिले.
(हेही वाचा – India Pakistan War : पाकड्यांच्या कुरापती सुरूच; चंदीगडमध्ये वाजले आपत्कालीन सायरन)
शेलारांचा आक्रमक पवित्रा
अॅड. आशिष शेलार यांनी घाटकोपरच्या लक्ष्मी नगर नाल्यापासून पाहणी दौऱ्याला सुरुवात केली. त्यानंतर एपीआय नाला, उषा नगर नाला, माहुल नाला, माहुल खाडी आणि खारू क्रिक परिसरात त्यांनी कामाची पाहणी केली. या वेळी आमदार मिहिर कोटेचा, माजी गटनेते भालचंद्र शिरसाट, विरोधी पक्षनेते रवी राजा, भाजपाचे पदाधिकारी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
AI आधारित मॅपिंगचा उपयोग
शेलार यांनी अनेक वर्षांपासून नालेसफाईसाठी तंत्रज्ञानाच्या वापराची मागणी केली होती. यंदा BMC ने AI चा वापर सुरू केला असून गाळ ज्या ठिकाणी टाकला जातो, त्या ठिकाणांचे व्हिडीओ स्कॅन करून डेटाचे विश्लेषण करण्यात आले.
(हेही वाचा – Rohit Sharma Retires : ‘सगळ्यांना तरुण कर्णधार हवा असतो,’ असं रोहित शर्मा का म्हणाला?)
“फेरफाराचे तातडीने विश्लेषण करा!”
“या फेऱ्यांमध्ये गाळाच्या स्वरूपात तफावत आढळली आहे. त्यामुळे गाळाची बील, ठिकाणे, वजनी फरक याचे सखोल विश्लेषण करावे. कंत्राटदारांकडून 100% काम करून घ्या. आयुक्तांनी स्वतः रस्त्यावर उतरून पाहणी करावी,” असे निर्देश शेलारांनी दिले.
कामे अर्धवट – पावसाळ्याच्या तयारीवर प्रश्नचिन्ह
- उषा नगर नाला : 2020 पासून ब्रिज आणि खोलीकरण अपेक्षित होते, मात्र आजही फक्त पुल तोडण्याचे काम सुरू. उरलेल्या 15 दिवसांत हे पूर्ण होईल का, यावर शंका.
- माहुल नाला : केवळ 10-15% काम पूर्ण.
- खारू खाडी : काम सुरूच नाही. प्लास्टिक आणि गाळाचा प्रचंड ढिगारा आढळला. नाल्याला भिंती नाहीत.
(हेही वाचा – भारत-पाकिस्तान तणावामुळे CA ची मुख्य परीक्षा पुढे ढकलली; विद्यार्थ्यांमध्ये चिंता वाढली!)
रेल्वे प्रवास धोक्यात?
शेलारांनी स्पष्ट केलं की, “या नाल्यांमध्ये योग्य वेळी काम न झाल्यास कांजूरमार्ग ते भांडूप दरम्यान रेल्वेमार्ग जलमय होण्याचा धोका आहे. त्यामुळे वेळीच गाळ काढणे आणि संरचना पूर्ण करणे गरजेचे आहे.”
तपास आणि कारवाईची मागणी
अशा स्थितीत नालेसफाईचे काम केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्षात झाले आहे का, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शेलारांनी स्पष्ट केलं की, “महानगरपालिका आयुक्तांकडे पाठपुरावा करून जबाबदारी निश्चित केली जाईल.”
हेही पहा –
Join Our WhatsApp Community