Shivrajyabhishek Din : ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, दि. ९ जून २०२५ रोजी किल्ले रायगडावर यंदा ३५२वा शिवराज्याभिषेक सोहळा(Shivrajyabhishek Din) पार पडणार आहे. याच शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक संपन्न झाली. राज्याचे कॅबिनेट मंत्री व आमदार भरत गोगावले यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या बैठकीस रायगड जिल्हाधिकारी जावळे, पोलीस अधीक्षक घारगे, शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीचे अध्यक्ष सुनील पवार यांच्यासह अन्य विभागाचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
या आढावा बैठकीत ३५२ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्या(Shivrajyabhishek Din)च्या तयारी संदर्भात चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर, शिवराज्याभिषेक सोहळ्यास उपस्थित राहणाऱ्या शिवभक्तांना महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीचे कार्याध्यक्ष सनी ताठेले, सचिव समीर वारेकर, जनसंपर्क प्रमुख रंजन गावडे, सदस्य संजय ढमाळ व निलेश सकट बैठकीस उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५२वे वर्ष आहे. ०९ जून २०२४ रोजी, तिथीनुसार ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी दिवशी शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाच्या सोहळ्याला किल्ले रायगडावर शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवितात. त्यामुळे शिवराज्याभिषेक सोहळ्याची संपूर्ण तयारी राज्य शासन आणि समित्यांच्या समन्वयातून केली जाते. शिवराज्याभिषेक दिन तारखेप्रमाणे व तिथीनुसार म्हणजे दि. ०६ जून दिवशी ग्रेगेरियन कॅलेंडरप्रमाणे तर तिथीनुसार ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी दिवशी साजरा केला जातो.(Shivrajyabhishek Din)
Join Our WhatsApp Community