-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
दादर छत्रपती शिवाजी महाराज मैदानाच्या (Shivaji Park) परिसरातील कचरा साफ करण्याची प्रक्रिया ही पारंपारिक पद्धतीने झाडू मारुन केली जात असली तरी ज्याप्रकारे ही सफाई केली जाते यामुळे उडणाऱ्या धुळीमुळे कट्ट्यांवर बसणाऱ्या नागरिकांना याचा प्रचंड त्रास होतो. त्यामुळे मैदानाच्या सभोवतालच्या परिसरात यांत्रिक झाडूद्वारे सफाई होणे आवश्यक असताना, प्रत्यक्षात मात्र अशाप्रकारची स्वच्छता येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावर केली जाते. त्यामुळे ही सफाई नागरिकांना दिलासा देण्यासाठी होते की त्यांना धुळीपासून त्रास देण्यासाठी होते असा प्रश्न येथील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
(हेही वाचा – India-Pakistan Border : BSF ने उधळून लावला दहशतवादी कट ; सीमेवरून हातबॉम्ब, काडतुसे, ३ पिस्तूल जप्त)
दादर पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान (Shivaji Park) मैदानाच्या बाजूला असलेल्या कठड्यांच्या दोन्ही बाजुला सकाळ आणि संध्याकाळी चालणाऱ्या नागरिकांची मोठ्याप्रमाणात गर्दी असते. एका बाजूला नागरिक आरोग्याच्या दृष्टीकोनातून याठिकाणी चालण्यास तसेच फिरण्यास येत येत असतानाच या भागाची स्वच्छता राखण्यासाठी महापालिकेच्यावतीने सकाळ आणि दुपारी दोन सत्रांमध्ये स्वच्छता राखण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे या दोन्ही सत्रांमध्ये साफ करण्यासाठी झाडू मारली जाते. मात्र, याठिकाणची स्वच्छता राखताना सफाई कामगारांकडून झाडू मारताना मोठ्याप्रमाणात धुरळा उडला जातो आणि उडणाऱ्या धुळीमुळे येथील कठड्यांवर बसणाऱ्या नागरिकांना तसेच फिरण्यास येणाऱ्या नागरिकांना या धुळीचा त्रास होतो. त्यामुळे झाडू मारत असतानाच नागरिकांना नाकावर रुमाल बांधून फिरावे लागते.
(हेही वाचा – Crime News : नैनीतालमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या मोहम्मद उस्मानवर गुन्हा दाखल ; हिंदू संघटनांनी केला निषेध)
मात्र, ज्याठिकाणी नागरिकांची मोठ्याप्रमाणात गर्दी असते, तसेच त्यांचा वावर असतो, त्यामुळे साफसफाई करताना यामुळे धुळीचा त्रास त्यांना होऊ नये याची काळजी घेणे आवश्यक असते. परंतु तशी काळजी घेतली जात नाही. मात्र, या मैदानाला जोडून असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावरील साफसफाई करण्यासाठी मिनी यांत्रिक झाडूचा वापर केला जातो. शहराचे माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरातील स्वच्छता राखण्यासाठी यांत्रिक झाडूच्या खरेदीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्यातून यांत्रिक झाडू उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत आणि या झाडूचा वापर स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गाच्या सफाईसाठी केली जात आहे. या यांत्रिक झाडूचा वापर सावरकर मार्गा ऐवजी मैदान परिसरातील स्वच्छता ही यांत्रिक झाडूने केल्यास चांगल्याप्रकारे सफाई होऊ शकते तसेच यामुळे उडणाऱ्या धुळीचाही त्रासही होणार नाही. महापालिका प्रशासनाने पारंपारिक पद्धतीने मैदानाच्या सभोवतालच्या परिसराची सफाई यांत्रिक झाडूने करावी अशाप्रकारची मागणीच रहिवाशांकडून केली जात आहे. (Shivaji Park)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community