Ship Building, Repair, Breaking उद्योग कोकणात येणार!

335
Ship Building, Repair, Breaking उद्योग कोकणात येणार!
  • खास प्रतिनिधी

राज्यात लवकरच जहाज बांधणी (Ship Building), जहाज दुरुस्ती (Ship Repair) आणि जहाज विल्हेवाट (Ship Breaking) व्यवसाय लवकरच सुरू होण्याच्या मार्गावर आहे. मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी यासाठी पाठपुरावा केला असून लवकरच कोकणात जहाज उद्योगाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती

राज्याला ७२० किमी समुद्र किनारा लाभला असून जहाज उद्योगाला पूरक असे वातावरण आहे. या गोष्टीचा उपयोग राज्य शासनाने करून घ्यायला हवा, यासाठी आपण प्रयत्न करणार असून यातून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीदेखील होईल, असे राणे यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना सांगितले.

(हेही वाचा – Pahalgam Terrorist Attack वरून रॉबर्ट वाड्रा यांनी ओकली गरळ; म्हणाले, मुसलमान नाराज झाले आहेत, म्हणून…)

जहाज उद्योग धोरण

जहाज उद्योगातून कोकणात ८,०००-१०,००० कोटी रुपये गुंतवणूक येईल तर ५,०००-१०,००० स्थानिक तरुणांना थेट रोजगार उपलब्ध होईल, असे सांगण्यात आले. याबाबतचे धोरण निश्चित करण्यासाठी बैठक झाली असून लवकरच जहाज उद्योगाचे राज्य सरकारचे धोरण अंतिम होईल. त्यानंतर ते राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अंतिम मंजुरीसाठी ठेवण्यात येईल, असे समजते.

या उद्योगामुळे राज्यात कौशल्य विकासाला चालना मिळणार तसेच आयात-निर्यातही वाढून त्यामुळे राज्याच्या उत्पन्नात भर पडेल, असे सांगण्यात येते.

आंतरराष्ट्रीय गुंतवणूक

भारतातील जहाजबांधणी आणि दुरुस्ती क्षेत्रात लक्षणीय गुंतवणूक आणि विस्तार योजना येत आहेत. केंद्र सरकारही देशांतर्गत जहाजबांधणी उद्योगासाठी प्रयत्न करत आहे, नवीन शिपयार्ड बांधण्याची आणि विद्यमान शिपयार्डचा विस्तार करण्याची योजना आखत आहे. जहाज दुरुस्ती क्लस्टर तयार करण्यावर आणि काही आंतरराष्ट्रीय खेळाडूंना भारतीय शिपयार्डमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आकर्षित करण्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे.

(हेही वाचा – सागरी महामंडळाने होर्डिंग आणि जागा वापराबाबत कठोर धोरण आखावे; Nitesh Rane यांचे निर्देश)

नवीन शिपयार्ड आणि क्लस्टर्स

महाराष्ट्र, गुजरात आणि आंध्र प्रदेशसह पाच राज्यांमध्ये जहाजबांधणी आणि जहाज दुरुस्ती क्लस्टर स्थापन करण्याची केंद्र सरकारची योजना आहे. कोचीन शिपयार्ड आणि कांडलासारख्या विद्यमान शिपयार्डचा विस्तार करण्याची योजना देखील आहे.

‘पर्यावरणवाद’ आडकाठी

कोकणात कोणताही नवीन प्रकल्प सुरू करण्याबाबात चर्चा सुरू होताच पर्यावरणवादी विरोध करण्यास सुरूवात करतात. वाढवण बंदरालाही असाच विरोध होत होता मात्र या प्रकल्पाचा लाभ लक्षात घेता हळू हळू विरोध मावळला. तसाच विरोध या जहाज बांधणी प्रकल्पांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र जहाज उद्योगामुळे कोकणच्या विकासाला चालना मिळेल, हे लक्षात आल्यावर कदाचित विरोध मावळेल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.