शर्मिष्ठा पनौलीने (Sharmishta Panoli) केलेल्या वक्तव्यानंतर माफी मागितली आहे. ती १९ वर्षीय आहे. तिच्या विरोधात पोलिसात तक्रार करणाऱ्या स्काय फाऊंडेशन (sky foundation) संघटनेचे मुख्य कार्यालय पाकिस्तानातील कराचीमध्ये आहे. पाकिस्तानातील (Pakistan) लोक कोलकाता येऊन तक्रार करतात आणि म्हणतात की, पोलिसांनी कारवाई केली नाही, तर आम्ही कारवाई करू. ‘सर तन से जुदा’च्या घोषणाही दिल्या गेल्या. जर शर्मिष्ठाने संविधानाच्या कलम २९५ ए चे उल्लंघन केलेले असेल, कोणाच्या धार्मिक भावना दुखावल्या असतील, तर कायद्याने कारवाई होऊ दे. मात्र तिच्या केसालाही धक्का लागला, तरी त्याला बंगालमधील (West Bengal) ममता बॅनर्जी सरकारचे पोलीस जबाबदार असतील, असा इशारा श्रीराम स्वाभिमान परिषद या संघटनेने दिला आहे.
(हेही वाचा – Viral Video : “गांधी परिवारातील सगळेच २४x७ राजकारणात होते, पण तुम्ही…”; गुलाम नबी आझाद यांचा व्हिडिओ व्हायरल)
बंगालचे मंत्रीच देतात धमक्या
श्रीराम स्वाभिमान परिषदेचे सेक्रेटरी सुरज कुमार सिंग या वेळी म्हणाले की, आम्ही एक सनातनी हिंदू म्हणून बोलत आहोत. बंगालमध्ये हिंदु धर्मावर चिखलफेक करणाऱ्यांवर कधीच कारवाई होत नाही. ‘जे लोक इस्लाममध्ये जन्म घेत नाहीत, ते अभागी आहेत’, असे येथील महापौर म्हणतात. मंत्री हुमायू कबीर म्हणतात, “हिंदूंना भागीरथी नदीत फेकू. मुर्शिदाबादमध्ये आम्ही ७० टक्के आहोत.” मंत्री सिद्दीकुलाह चौधरी म्हणतात, “आम्ही प्रत्येक पोलीस ठाणे बंद करू शकतो. पूर्ण कोलकाता जाम करू शकतो.” हे सगळे आतापर्यंत त्यांनी करून दाखवले आहे. त्यामुळे आमच्या हिंदू बहिणीची कोणतीही हानी होऊ नये, याची आम्ही काळजी घेत आहोत.
शर्मिष्ठा केस में बहुत बड़ा खुलासा 🚨
ममता की पुलिस पाकिस्तानी संस्था के इशारे पर नाच रही
शर्मिष्ठा पर FIR करने वाली और पुलिस पर दबाव डालने वाली ‘SKY फॉउंडेशन’ का मुख्य कार्यालय पाकिस्तान में है
हिंदुओं रिपोस्ट अब रुकना नहीं चाहिए स्काई फाउंडेशन को झुकाना हैं बहन को घर लाना है pic.twitter.com/AvwSISHqmA
— Amrendra Bahubali 🇮🇳 (@TheBahubali_IND) May 31, 2025
सुरज कुमार सिंग यांनी या वेळी बंगालमध्ये केल्या जाणाऱ्या नारेबाजीचाही उल्लेख केला. ते म्हणाले, “आम्ही कोलकाता येथील अलीपूर न्यायालयात आलो आहोत. आम्ही पहात आहोत की, येथील लोक अल्लाच्या नावावर नारेबाजी करत आहोत. तिच्या अटकेवर आनंद व्यक्त करत आहेत. त्यामुळे शर्मिष्ठाच्या विरोधात तक्रार करणाऱ्या स्काय फाऊंडेशनचे ऑडिट व्हावे, तिच्यावर कारवाई व्हावी. पाकिस्तानच्या संघटनेचे इथे कोण प्रतिनिधी आहेत, हे सर्वांसमोर यावे, असे आमचे आवाहन आहे.”
हेही पहा –
Join Our WhatsApp Community