Share Market Success Story : १९९० ची १ लाख रुपयांची गुंतवणूक पोहोचली ८० कोटींवर!

Share Market Success Story : वडिलांनी घेतलेले शेअर ३५ वर्षं ठेवल्यावर झाली तगडी कमाई.

82
Share Market Success Story : १९९० ची १ लाख रुपयांची गुंतवणूक पोहोचली ८० कोटींवर!
  • ऋजुता लुकतुके

वडिलांनी केलेली एखादी गुंतवणूक तुमच्या नजरेतून सुटली. ती समोर आल्यावर त्याचं मूल्य काही कोटींच्या घरात पोहोचलेलं तुम्हाला कळलं तर? स्वत: शेअर बाजारातील एक गुंतवणूकदार असलेले सौरव दत्ता यांनी एक विलक्षण अनुभव अलीकडेच घेतला आहे. १९९० साली एका ग्राहकाच्या वडिलांनी जेएसडब्ल्यू कंपनीचे शेअर १ लाख रुपयांची गुंतवणूक करून खरेदी केले होते. तेव्हा शेअर सर्टिफिकिटच्या स्वरुपात असलेली ही गुंतवणूक त्यांच्या मुलाला २०२५ मध्ये दिसली. आणि गंमत म्हणजे ही सर्टिफिकिट डिमटेरियलाईझ केल्यावर त्यांचं मूल्य तब्बल ८० कोटींच्या घरात पोहोचलं होतं. (Share Market Success Story)

ऑनलाईन ही स्टोरी भलतीच व्हायरल झाली आहे. ‘शेअरचं विभाजन, बोनस आणि लाभांश यातून किती मिळकत होईल याचा अंदाज घेणंही कठीण आहे,’ असं त्यांनी म्हटलं आहे. (Share Market Success Story)

(हेही वाचा – French Open 2025 : साडेपाच तास चाललेल्या सामन्यात ३ मॅच पॉइंट वाचवत कार्लोस अल्काराझची फ्रेंच ओपनमध्ये सरशी)

जेएसडब्ल्यू स्टीलच्या एका शेअरची किंमत सध्या १,००० रुपयांच्या वर आहे. म्हणजेच बोनस शेअर तसंच विभाजन धरून या गुंतवणूकदाराकडे आता ८०,००० शेअर जमले आहेत. त्यातून त्यांच्या पश्चात मुलाची कमाई ८० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. अशी आणखी काही उदाहणं शेअर बाजारात पाहायला मिळतात. १९९० मध्ये रिलायन्सचे ३० शेअर विकत घेतलेल्या एका गुंतवणूकदाराकडे या घडीला रिलायन्सचे ९६० शेअर जमले आहेत. त्यांचं मूल्य ११ लाखांच्या वर आहे. (Share Market Success Story)

वरील उदाहरणात ३५ वर्षांत गुंतवणूकदाराला निव्वळ नफाच काही लाख टक्क्यांचा झाला आहे. ज्या लोकांकडे जुन्या शेअर सर्टिफिकीटच्या स्वरुपात शेअर आहेत. त्यांना आधी ती डिमटेरियलाईझ करून घ्यावी लागतात. त्यासाठी तुमचं डिमॅट खातं असणं आवश्यक आहे. ही प्रक्रिया सोपी असून सीडीएसएल किंवा एनएसडीएल या संस्थांमध्ये जाऊन ती करता येते. (Share Market Success Story)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.