Share Market: जागतिक घडामोडींचा शेअर बाजारावर परिणाम, गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान

गुरुवारी शेअर बाजाराची सुरुवात निराशाजनक झाली

75
Share Market: जागतिक घडामोडींचा शेअर बाजारावर परिणाम, गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान
Share Market: जागतिक घडामोडींचा शेअर बाजारावर परिणाम, गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान

इस्रायल-हमास युद्धामुळे जागतिक शेअर बाजारावर (Share Market) मोठा परिणाम होत आहे. सलग सहाव्या दिवशी बाजार सुरू होताच मोठी घसरण झाली. गुरुवारी शेअर बाजाराची सुरुवात निराशाजनक झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ७०० अंकांनी घसरला आहे, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक २०० अंकांनी घसरला आणि निफ्टी १९००० अंकांखाली आहे.

बाजारातील या घसरणीचा मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअरला (Mid Cap and Small Cap) मोठा फटका बसला आहे. गेल्या ६ दिवसांत गुंतवणूकदारांचे २० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. गुरुवारी बाजाराची सुरुवात मंदिने झाली. बाजार सुरू होताच मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ७३५.०१ टक्क्यांची घसरण झाली.

(हेही वाचा – Pune Air Pollution : पुणेकरांनो जरा जपून! शहरातील वायू प्रदूषणात होतेय झपाट्याने वाढ)

निफ्टीतील मिडकॅप शेअरमध्ये १.८८ टक्के, तर स्मॉलकॅप शेअरमध्ये २.५७ टक्के घसरण दिसून आली. गुरुवारच्या एका दिवसातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांना ५ लाख कोटींचा फटका बसला आहे. इस्त्रायल-हमास युद्धाची तीव्रता वाढत असल्याचे आणखी काही दिवस बाजारात अशीच घसरण होण्याची शक्यता स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

बजाज फायनान्स, टेक महिंद्रा, यूपीएल आणि नेस्ले, एम डी एम हे NSE वर सर्वाधिक तोट्यात आहेत. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक प्रत्येकी 1 टक्क्यांनी घसरले. सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल रंगात व्यवहार करत आहेत.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.