
भारताच्या विजयासाठी, तसेच सैनिकांसह देश-विदेशातील साधक आणि समस्त धर्मप्रेमी यांच्या रक्षणासाठी ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या निमित्ताने गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर ३५ पुरोहितांद्वारे शतचंडी याग पार पडला. शतचंडी याग चांगल्या प्रकारे पूर्ण झाल्याविषयी आणि सनातन संस्थेचे कार्य उत्तरोत्तर वाढत रहावे, यांसाठी २२ मे या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातन संस्थेच्या आश्रमात ‘श्री ललिता त्रिशती देवी’ची पूजा भावपूर्ण वातावरणात करण्यात आली. या पूजेत तमिळनाडू येथील गुरुमूर्ती शिवाचार्य, अरुणकुमार गुरुमूर्ती यांनी त्रिपुरासुंदरी त्रिशती देवीची नावे उच्चारत पुष्पार्चना केली. (Shankhnad Mahotsav 2025)
(हेही वाचा – Indo – Pak Tension : पाकिस्ताने भारतीय विमानांसाठी हवाई हद्द मनाई महिन्याभरासाठी वाढवली)
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति बिंदा नीलेश सिंगबाळ आणि सद्गुरु नीलेश सिंगबाळ, तसेच श्रीचित्शक्ति अंजली मुकुल गाडगीळ अन् सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी पूजेचे यजमानपद भूषवले. या वेळी सनातनचे उपस्थित संत आणि साधक यांनी पूजेच्या संकल्पपूर्तीसाठी श्री ललितादेवीच्या चरणी मनोभावे प्रार्थना केली. शतचंडी यागात आद्यहोम, सप्तशती पारायण, कन्यापूजन, सुवासिनी पूजन, ब्रह्मचारी पूजन, दांपत्य पूजन, गोपूजन या धार्मिक विधीनंतर पूर्णाहुती आदी धार्मिक विधी झाले. १०० पाठांचा जप आणि १० पाठांचे हवन करण्यात आले. श्री ललिता त्रिशती देवीची पूजा ललितादेवीची कृपा आणि आशीर्वाद मिळण्यासाठी केली जाते. या पुजेतून सैनिक, साधक आणि धर्मप्रेमी यांच्या शरीरासह, मन, बुद्धी आणि सूक्ष्म देह यांभोवती संरक्षण कवच निर्माण व्हावे, यासाठी आदिशक्तीच्या चरणी प्रार्थना करण्यात आली. (Shankhnad Mahotsav 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community