काश्मीर येथील पहलगाम आक्रमणानंतर भारताने दिलेल्या जोरदार प्रत्युत्तानंतर जरी ‘शस्त्रसंधी झाली असली, तरी पाकिस्तानकडून विविध मार्गाने भारतविरोधी कुरापती चालूच आहेत. त्यामुळे भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्षात भारताचा विजय व्हावा म्हणून सनातन संस्थेच्या वतीने आयोजित ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ च्या ठिकाणी २० ते २२ मे २०२५ या तीन दिवसांच्या कालावधीत २५ पुरोहितांद्वारे शतचंडी यज्ञ करण्यात येणार आहे. हा यज्ञ सर्व नागरिकांसाठी खुला असून यात देशविदेशातील नागरीक सहभागी होणार आहेत. या यज्ञात सहभागी होणारे लोक भारताच्या विजयासाठी प्रार्थना करणार आहेत, अशी माहिती सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी दिली. (Shankhnad Mahotsav 2025)
(हेही वाचा – चुकीच्या पद्धतीने सशुल्क वाहनतळाच्या कंत्राटाला मुदतवाढ; Adv. Makarand Narvekar यांनी केली ‘ही’ मागणी)
देवभूमी, तपोभूमी, अवतारभूमी आणि पृथ्वीवरील एकमेव सनातन राष्ट्र असलेल्या भारताच्या रक्षणासाठी अन् विजयासाठी होणार्या शतचंडी यज्ञाचे सप्तशतीचा सामूहिक पाठ, यज्ञविधी, आहुती आणि पूर्णाहूती आदी स्वरूप असणार आहे. २० मे रोजी दुपारी ४ ते रात्री ८; २१ मे रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० आणि दुपारी ४ ते रात्री ८; २२ मे रोजी सकाळी ८.३० ते दुपारी १.३० या वेळेत हा शतचंड यज्ञ होणार आहे. (Shankhnad Mahotsav 2025)
(हेही वाचा – IPL 2025, Shubman Gill : शुभमन गिलने दाखवून दिली कर्णधार म्हणून मनाची स्थिरता)
शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन, तसेच संतांच्या पादुकांचे दर्शनाची सुवर्णसंधी !
या महोत्सवात आणखीन ३ दिवस गोव्यातील शंखनाद महोत्सवाच्या ठिकाणी सौंदेकर घराण्यातील प्राचीन शस्त्रे, कोल्हापूर येथील सव्यासाची गुरुकुलम्चे शस्त्रप्रदर्शन, पुणे येथील शिवाई संस्थानचे शस्त्रप्रदर्शन ठेवण्यात येणार आहे. हे शस्त्रप्रदर्शन ६ हजार चौरसफूट क्षेत्रात भव्य मांडण्यात आले आहे. याच समवेत विविध संतांच्या पावन पादुकांचे दर्शन घेण्याची सुवर्णसंधीही या निमित्ताने भाविकांना मिळणार आहे. यात प्रामुख्याने प. पू. गोंदवलेकर महाराज, प. पू. गुळवणी महाराज, समर्थशिष्य कल्याणस्वामी, प. पू. भीमस्वामी महराज, प. पू. सिद्धारूढ महाराज, प.पू. ब्रह्मानंद महाराज, पू. वेणास्वामी (मिरज) यांचा समावेश आहे. (Shankhnad Mahotsav 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community