Shankhnad Mahotsav 2025 : सद्यस्थितीत भारतात १० कोटी बांगलादेशी घुसखोर (Bangladeshi Infiltrators) आहेत. संपूर्ण महाराष्ट्र वसेल इतके भारतात बांगलादेशी घुसखोर (Bangladeshi Infiltrators) असल्याचे विधान स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी केले. फोंडा येथील ‘सनातन राष्ट्र शंखनाद’ (Shankhnad Mahotsav 2025) महोत्सवात बोलताना रणजित सावरकर म्हणाले, जोपर्यंत हिंदुत्वनिष्ठ सरकार असेल, तोपर्यंत पोलीस त्यांच्या आदेशाने कार्य करू शकतात. भारताचे केंद्रीय गृहमंत्री मुसलमान असतांना देशात ५ लाख हिंदूंच्या हत्या झाल्या असे सांगतानाच कमजोर आणि देशद्रोही सरकार असेल, तर देशासाठी धोकादायक आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
सद्यस्थितीत शत्रूराष्ट्राच्या आक्रमणाला तोंड देण्यासाठी भारतीय सेना सशक्त आहे मात्र, गृहयुद्ध झाल्यास त्याला तोंड देण्याइतके पोलीस सक्षम नसल्याचेही त्यांनी सांगितले. हिंदूंचे राजनितीकीकरण आणि राजनीतीचे सैनिकीकरण होणे आवश्यक असून हिंदू बळशाही व्हायला हवेत. स्वातंत्र्यानंतर देशात सत्तेवर आलेल्या सरकारने याकडे लक्ष दिले नसल्याने देशाचे अवमूल्यन झाले, असे परखड मत रणजित सावरकर यांनी व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी हिंदूंच्या संघटनाला प्रारंभ केला. सनातन राष्ट्रासाठी शंखनाद म्हणजे बचावाची नव्हे, शत्रूची सेना युद्धासाठी पुढे असतांना त्यांना दिलेले युद्धाचे आव्हान आहे. सनातनच्या गोवा येथील आश्रमात आल्यावर मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक कार्याची प्रचिती आली. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले असे एकमात्र व्यक्ती आहेत, जे राष्ट्राला दिशा देण्यासाठी कार्य करत आहेत असे सांगतानाच हिंदूंना बळशाली करण्याचे कार्य सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले करत असल्याचे रणजित सावरकर यांनी सांगितले.
‘ओम प्रमाणपत्राद्वारे’ हिंदू ग्राहकांचे संघटन आवश्यक – रणजित सावरकर
हिंदू भारतात अल्पसंख्य झाले तर त्यांना इतर ठिकाणी जाण्यासाठी जगात हिदूंचा एकही देश नाही. त्यामुळे येणार्या काळात दिशात हिंदूंची सत्ता असायला हवी, अशी भूमिका रणजित सावरकर यांनी मांडली. ओम प्रमाणपत्राबाबत भाष्य करताना ते म्हणाले, सद्यस्थितीत मुसलमानांनी भारतातील अर्थकारणावर पकड घट्ट केली असून त्यामुळे हिंदूंनी हिंदूंसमवेत आर्थिक व्यवहार करायला हवा. यासाठी ‘ओम प्रतिष्ठान’द्वारा हिंदू उद्योजकांनी ‘हिंदू शुद्धता मानक प्रमाणपत्र’द्वारे हिंदू ग्राहकांचा संघटन होणे आवश्यक असल्याचे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी सांगितले.(Shankhnad Mahotsav 2025)
Join Our WhatsApp Community