Shani Shingnapur : शनिशिंगणापूर देवस्थान(Shani Shingnapur)ने मोठा निर्णय घेतला असून देवस्थानात कार्यरत असणाऱ्या १६७ कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. अहिल्यानगरमधील शनिशिंगणापूर देवस्थाना(Shani Shingnapur)तील हकालपट्टी केलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये ११४ मुस्लिम कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांवर अनियमितता व शिस्तभंगाच्या कारणास्तव कारवाई करण्यात आली आहे.(Shani Shingnapur)
विशेष म्हणजे, अनियमितता व शिस्तभंगाच्या कारणास्तव कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आल्याचे देवस्थानाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे मागील काही दिवसांपासून मुस्लिम कर्मचाऱ्यांना काढण्याबाबत हिंदू संघटनांनी दबाव आणल्याच्या चर्चा सुरू होत्या. तसेच, आता शनिदेवाच्या चौथ्याऱ्यावर मुस्लिम व्यक्तींकडून विधी करून घेतल्यामुळे सकल हिंदू समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते.
(हेही वाचा Redevelopment : कामाठीपुरातील विकासाचा मार्ग मोकळा; ८००१ भाडेकरू आणि ८०० जमीन मालकांच्या स्वप्नांना पंख फुटणार )
दि. १४ जूनला मंदिराबाहेर संपूर्ण हिंदू समाजाकडून मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला. जिल्ह्यातील प्रसिध्द धार्मिक स्थळ असलेल्या शनि शिंगणापूर मंदिरा(Shani Shingnapur)त मुस्लिम कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीवरून वाद निर्माण झाला होता. हिंदू संघटनांच्या आक्रमक पावित्र्यानंतर देवस्थानाकडून मोठा निर्णय घेण्यात आला असून ट्रस्टने सर्व मुस्लिम कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावरून काढून अशी संघटनेची मागणी मान्य केली आहे.
मंदिराच्या विश्वस्त मंडळाने सर्व मुस्लिम कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रस्टमध्ये 114 मुस्लिम कर्मचारी काम करतात हे मान्य केलं असून या कर्मचाऱ्यांपैकी एकाही मुस्लिम कर्मचाऱ्याची ड्युटी मंदिराच्या मुख्य गर्भगृहात किंवा चबुतऱ्यावर नाही, असे मंदिर ट्र्स्ट(Shani Shingnapur)ने स्पष्ट केले आहे. कारवाई करण्यात आलेले सर्व कर्मचारी शेती, कचरा व्यवस्थापन, शिक्षण यांसारख्या विविध विभागात कार्यरत आहेत. मागील पाच महिन्यांपासून अनुपस्थित ९९ कर्मचाऱ्यांच्या पगारही स्थगित केला आहे.(Shani Shingnapur)
Join Our WhatsApp Community