अस्वच्छ शौचालयाचा फोटो पाठवा, Fastag मध्ये मिळवा १००० रुपये; काय आहे आवाहन ?

168
अस्वच्छ शौचालयाचा फोटो घेत असलेला व्यक्ती
प्रवाशांना अस्वच्छ शौचालयाचे फोटो पाठवून बक्षीस मिळवता येईल.

स्वच्छ भारत अभियानाने जोर धरला, तसे सर्वत्र स्वच्छता मोहिमा सुरु झाल्या आहेत. आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) एक आवाहन केले आहे. प्रवास करतांना प्रवाशाला टोल प्लाझावर अस्वच्छ शौचालय (unclean toilet) दिसले, तर तो त्याचा फोटो पाठवून १,००० रुपयांचे बक्षीस मिळवू शकतो. हे बक्षीस थेट त्यांच्या FASTag खात्यात रिचार्ज म्हणून जमा केले जाईल. ही मोहीम देशभरातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवर ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत चालेल.

(हेही वाचा – Dadar : सुस्थितीतील कपडे, पुस्तके दान करण्याच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद)

ही योजना फक्त एनएचएआयच्या नियंत्रणाखालील शौचालयांना लागू असेल. ढाबे, पेट्रोल पंप किंवा खासगी संस्थांच्या शौचालयांचा यात समावेश नसेल. एका वाहन क्रमांकाला केवळ एकदाच बक्षीस मिळेल आणि एका शौचालयासाठी एका दिवसात अनेक तक्रारी आल्यास, केवळ पहिल्या वैध तक्रारीलाच बक्षिसासाठी विचारात घेतले जाईल.

कसे मिळवायचे बक्षीस ?

सरकारने जारी केलेल्या निवेदनानुसार, हे बक्षीस मिळवण्यासाठी प्रवाशांना ‘राजमार्गयात्रा’ अॅपचा वापर करावा लागेल. अॅपमध्ये वापरकर्त्याला जिओ-टॅग्ड, टाइम-स्टॅप्ड फोटो अपलोड करावा लागेल. तसंच आपलं नाव, वाहन क्रमांक, मोबाईल नंबर आणि ठिकाण देखील नमूद करावे लागेल. जर फोटो योग्य आढळला, तर त्या वाहन क्रमांकाला १,००० रुपयांचे बक्षीस FASTag रिचार्ज म्हणून मिळेल. परंतु, हे बक्षीस ट्रान्सफरेबल नसेल आणि ते रोख स्वरूपात घेता येणार नाही.

लोकांमध्ये वाढेल जबाबदारी

स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासोबतच, लोकांमध्ये जबाबदारी आणि जागरूकता वाढवण्याचा हा उपक्रम आहे. जनतेच्या सहभागातूनच रस्त्याच्या बाजूच्या सुविधा सुधारल्या जाऊ शकतात. अशी तक्रार करणाऱ्यांना बक्षीस देऊन सरकार स्वच्छतेला एक जनआंदोलन बनवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. ही मोहीम ‘स्वच्छ भारत’च्या भावनेला पुन्हा गती देणारी सिद्ध होऊ शकते, असे एनएचएआयने म्हटले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.