Senate Election : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी अशी करा नोंदणी

65
Senate Election : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी अशी करा नोंदणी

काही दिवसांपूर्वी मुंबई विद्यापीठाकडून अचानक सिनेट निवडणुकीला (Senate Election) स्थगिती देण्यात आली होती. पुढील आदेश मिळेपर्यंत ही स्थगिती कायम ठेवण्यात आली. अशातच आता मुंबई विद्यापीठाकडून सिनेट निवडणुकीचे (Senate Election) संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका आता थेट पुढल्या वर्षी म्हणजेच एप्रिल महिन्याच्या २१ तारखेला होणार आहेत. तर २४ एप्रिल २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीसाठीच्या नोंदणीसाठी नव्याने मतदार नोंदणीला आजपासून (३० ऑक्टोबर) सुरुवात झाली आहे.

मुंबई उच्च न्यायालयात सिनेट निवडणुका (Senate Election) स्थगित केल्याच्या विरोधात याचिका दाखल केल्यानंतर मुंबई विद्यापीठाने सुधारित संभाव्य निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार ३० ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान सिनेट निवडणुकांसाठी नव्याने मतदार नोंदणी करावी लागणार आहे.

(हेही वाचा – Kerala Bomb Blast : केरळ बॉम्ब स्फोट प्रकरणी एकाचे आत्मसमर्पण)

मुंबई विद्यापीठाच्या भवितव्यासाठी सिनेट निवडणूक महत्वाची आहे. तसेच या निवडणूकीमध्ये (Senate Election) आपले मतदान करण्यासाठी आपली मतदार म्हणून नोंदणी होणे गरजेचे आहे. यासाठी नोंदणी कशी करायची हे आपण जाणून घेऊया. खाली दिलेल्या काही स्टेप्स फॉलो करुन पदवीधरांना नोंदणी करता येणार आहे.

अशी करा नोंदणी

१) ऑनलाईन मतदार नोंदणी आधी फोटो, सही, आधार कार्ड (Front & Back) आणि निवासाचा पुरावा हे जेपीजी फॉर्मेटमध्ये असावेत तसेच पदवी प्रमाणपत्र कन्व्हॉकेशन सर्टिफिकेट (Convocation Certificate) विवाह नोंदणी प्रमाणपत्र (महिलांसाठी ) पीडीएफ फॉर्मेटमध्ये असावेत. यावेळी पदवीधरांनी मार्कशीट अपलोड करू नये.

२) ऑनलाईन मतदार नोंदणीसाठी मुंबई विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइट https://muelection.eduapp.co.in ला भेट द्यावी.

३) यानंतर Login/Registration हा पर्याय उपलब्ध होईल. त्यामध्ये रजिस्ट्रेशन हा पर्याय निवडून यूझर आयडी आणि पासवर्ड तयार करा.

४) यूझर आयडी आणि पासवर्ड तयार झाल्यावर लॉगिन करून फार्म पूर्ण भरावा व सर्व कागदपत्रे व्यवस्थित अपलोड करा.

५) आपण भरलेली माहिती व कागदपत्रे ही अचूक असल्याची खात्री झाल्या नंतर आपण Proceed for Payment option वर क्लिक करावे.

६) पदवीधरांना नोंदणी करताना ठराविक रक्कम भरावी लागेल.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.