Reliance Group: मुकेश अंबानी यांना दुसरा धमकीचा मेल, खंडणीची रक्कम २० कोटींवरून २०० कोटींवर

२४ तासांच्या आत आलेल्या धमकीच्या दोन्ही ई-मेलमुळे खळबळ उडवून दिली

122
Reliance Group: मुकेश अंबानी यांना दुसरा धमकीचा मेल, खंडणीचा रक्कम २० कोटींवरून २०० कोटींवर
Reliance Group: मुकेश अंबानी यांना दुसरा धमकीचा मेल, खंडणीचा रक्कम २० कोटींवरून २०० कोटींवर

रिलायन्स समूहाचे (Reliance Group) अध्यक्ष मुकेश अंबानी यांना ईमेल द्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याच्या घटनेला २४ तास उलटत नाही तोच शनिवारी दुसरा धमकीचा ईमेल (Second threatening mail) त्यांना आला आहे. पहिल्या मेल मध्ये २० कोटींची मागणी करण्यात आली होती आणि दुसऱ्या ईमेल मध्ये २०० कोटींची मागणी करण्यात आली आहे. “आपण माझा ईमेलला प्रतिसाद दिला नाही, आता रक्कम २०० कोटी आहे अन्यथा मृत्यू वॉरंटवर स्वाक्षरी केलेली आहे. हा मजकूर ई-मेलमध्ये लिहिण्यात आला आहे. एका पाठोपाठ आलेल्या धमकीच्या दोन ई-मेलने खळबळ उडवून दिली आहे. पहिला ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीचे नाव शादाब खान असल्याची माहिती समोर आली असून त्याच्याच ई-मेलवरून दुसरा मेल आला असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

याप्रकरणी मुंबई पोलिसांनी मुकेश अंबानी यांच्या घराजवळील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली असून गावदेवी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांची सर्व यंत्रणा या ई-मेल कर्त्याचा शोध घेत आहे.

(हेही वाचा – Pulses Price Hike : सणासुदीच्या काळात डाळींच्या किमती आटोक्यात ठेवण्याचं आव्हान )

रिलायन्स समूहांचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या ई-मेल वर शुक्रवारी रात्री एका ई-मेल आला होता, या ई-मेल करणाऱ्याने मुकेश अंबानी यांच्या कडे २० कोटी रुपयांची खंडणीची मागणी केली होती, अन्यथा जीवे ठार मारू अशी आशयाची धमकी देण्यात आली होती. “तुम्ही आम्हाला २० कोटी रुपये दिले नाहीत, तर आम्ही तुम्हाला गोळ्या घालून ठार करू, भारतात आमच्याकडे सर्वोत्तम शार्प शूटर आहेत”, असे अंबानी यांना आलेल्या धमकीच्या पहिल्या ई-मेल मध्ये लिहिण्यात आले आहे. याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी खंडणी आणि धमकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरु केला होता. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन १२ तास उलटत नाही तोच शनिवारी सायंकाळी अंबानी यांच्या ईमेलवर दुसरा धमकीचा ई-मेल आला आहे, दुसऱ्या ईमेल मध्ये “आपण माझा ई-मेलला प्रतिसाद दिला नाह, आता रक्कम २०० कोटी आहे अन्यथा मृत्यू वॉरंटवर स्वाक्षरी केलेली आहे” मजकूर ईमेलमध्ये लिहण्यात आला आहे.

२४ तासांच्या आत आलेल्या धमकीच्या दोन्ही ई-मेल मुळे खळबळ उडवून दिली असून पोलिसांनी हे प्रकार गंभीरतेने घेतले असून अंबानी यांचा घराजवळील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. पहिला ई-मेल हा शादाब खान या व्यक्तीच्या मेल वरून आला होता मात्र हा शब्द खान कोण आहे, याबाबत अद्याप काहीही उघडकीस आलेले नाही. मात्र हा ई-मेल भारता बाहेरून आला असावा अशी शक्यता वर्तवली जात असून या ई-मेल कर्त्याच्या शोध घेण्यासाठी मुंबई गुन्हे शाखा, सायबर गुन्हे तपास करीत आहे तसेच केंद्रीय यंत्रणा देखील कमला लागली लागली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.