राज्यातील शाळांना १ डिसेंबरचा मुहूर्त! आरोग्य विभागाच्या ‘या’ आहेत मार्गदर्शक सूचना

67

ओमिक्रॉन हा कोरोना विषाणूचा नवा व्हेरियंट आढळल्यानंतर शाळा सुरू करण्याबाबत राज्यात पुन्हा एकदा संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. परंतु राज्य सरकार शाळा सुरू करण्यावर ठाम असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच १ डिसेंबर रोजी शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे विद्यार्थी, पालक, शिक्षक व शालेय व्यवस्थापनाला आवश्यक आहे.

मार्गदर्शक सूचनांमधील ठळक मुद्दे

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच शालेय व्यवस्थापनातील प्रत्येक व्यक्तींनी लस घेणे बंधनकारक असणार आहे. दोन जणांमध्ये सहा फूटाचे अंतर असणे आवश्यक आहे. एखाद्या विद्यार्थ्यामध्ये कोरोना विषयक लक्षणे आढळली तर, ऑनलाईन शिक्षणाची सोय उपलब्ध असावी. विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी बायोमॅट्रीक उपस्थिती घेऊ नये. शाळेमध्ये सर्वांना मास्कचा वापर करणे बंधनकारक असणार आहे.

( हेही वाचा : ओमिक्रॉन व्हेरिएंट : मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी चर्चा करण्याची मंत्रिमंडळाची सूचना )

चिंतेचे कारण नाही

ओमिक्रॉन या विषाणूचे रुग्ण अद्याप महाराष्ट्रात आढळले नसून, चिंता करण्याची गरज नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, शाळा सुरू करण्याबाबत कोणताही संभ्रम न बाळगता शाळा १ डिसेंबरलाच सुरू होतील. यावर बालरोगतज्ज्ञांशी चर्चा करूनच योग्य निर्णय घेतला आहे, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

Page 1

Page 2

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.