School Issue in Village : राज्यात शिक्षणाचा अंधार! तब्बल 8 हजार गावे शाळेविना, मुलांच्या आरोग्यावरही धोका

64

प्रतिनिधी

School Issue in Village : राज्यातील हजारो गावांमध्ये शाळांचाच पत्ता नाही, ही धक्कादायक स्थिती नुकत्याच एका अहवालातून समोर आली आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील तब्बल 8,213 गावे प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शिक्षणापासून वंचित आहेत. यामुळे केवळ शिक्षणाचाच नाही, तर मुलांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होतो आहे, अशी चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. (School Issue in Village)

(हेही वाचा – India’s Tour of England : इंग्लंड दौऱ्यापूर्वी सर्फराझ खानने केलं १० किलो वजन कमी)

या आकडेवारीनुसार 1,650 गावे प्राथमिक शाळेपासून पूर्णतः वंचित आहेत, तर 6,563 गावे उच्च प्राथमिक शाळा नसल्याने विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी किलोमीटरच्या अंतरावरची शाळा गाठावी लागते. अनेक वेळा ही शाळा नसल्यामुळे शिक्षण अर्धवट सोडले जाते, विशेषतः मुलींमध्ये गळतीचं प्रमाण अधिक आहे.

शाळा नसल्याने मुलांच्या दैनंदिन जीवनशैलीवर विपरित परिणाम होत असून, हालचाल कमी आणि असंतुलित आहारामुळे मधुमेहासारखे आजार लहान वयातच वाढत आहेत, असा इशारा आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे. यामुळे शिक्षणाचा अभाव आता केवळ सामाजिक नाही, तर आरोग्यदृष्ट्याही गंभीर बाब बनली आहे.

केंद्र शासनाने या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला शैक्षणिक पायाभूत सुविधा सुधारण्याचे निर्देश दिले आहेत. नवीन शाळा उभारणे, शिक्षकांची भरती आणि आरोग्य शिक्षणाचा समावेश या उपाययोजना तातडीने राबवण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

(हेही वाचा – Illegal Infiltrators : केंद्रीय गृहमंत्रालयाचे राज्यांना महत्त्वाचे निर्देश; अवैध घुसखोरांवर ३० दिवसांच्या आत कारवाई करा)

ही स्थिती बदलण्यासाठी आता धोरणात्मक निर्णय आणि जलद अंमलबजावणी अत्यावश्यक ठरत आहे, अन्यथा पुढच्या पिढीचे भवितव्य अंधारात ढकलले जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.