शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी स्कूल बस नियमावलीत होणार सुधारणा; परिवहनमंत्री Pratap Sarnaik यांची ग्वाही

47
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी स्कूल बस नियमावलीत होणार सुधारणा; परिवहनमंत्री Pratap Sarnaik यांची ग्वाही
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी स्कूल बस नियमावलीत होणार सुधारणा; परिवहनमंत्री Pratap Sarnaik यांची ग्वाही

शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुसज्ज व सुलभ व्हावा, यासाठी स्कूल बस नियमावलीत लवकरच आवश्यक सुधारणा करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी दिली. नियम हे केवळ कायद्याच्या भीतीपोटी नव्हे तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या भावनेतून पाळले जावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात (Yashwantrao Chavan Auditorium) आयोजित बैठकीत स्कूल बस (School Bus) असोसिएशन व पालक असोसिएशनच्या प्रतिनिधींची उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली. परिवहन आयुक्त विवेक भीमनवार व इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

(हेही वाचा – “भारताच्या कसोटीतील स्थित्यंतरासाठी विराट जबाबदार” ; Bhuvneshwar Kumar याचे कौतुकोद्गार)

नियमावलीत बदल, पण सुरक्षा प्रथम

परिवहन मंत्री सरनाईक (Pratap Sarnaik) म्हणाले, “नियमावलीत सुधारणा करताना वाहनचालक व पालकांच्या अडचणी आणि भावना समजून घेतल्या जातील. मात्र विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. नियम सुलभ असतील, पण शिथिल नाहीत.”

अनधिकृत स्कूल बसवर कारवाई निश्चित

बैठकीत समोर आलेल्या माहितीप्रमाणे, राज्यात सध्या ४० हजार अधिकृत स्कूल बसेस कार्यरत असताना ५० ते ६० हजार अनधिकृत बसेस विद्यार्थ्यांची वाहतूक करत आहेत. या धोकादायक प्रवासाविरोधात कारवाईची भूमिका सरकारने घेतली आहे. पुढील ३ महिन्यांत अधिकृत नोंदणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले असून, त्यानंतर कारवाई होणार आहे.

मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, “३ महिन्यांनंतर अनधिकृत बस सापडल्यास संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाईल.”

(हेही वाचा – इस्रायलचा हुथी बंडखोरांवर पुन्हा हल्ला; येमेनमधील Sanaa International Airport बंद)

महाराष्ट्र – स्कूल बस धोरण राबवणारे पहिले राज्य

परिवहन आयुक्त विवेक भीमनवार (Vivek Bhimanwar) यांनी सांगितले की, महाराष्ट्र हे शालेय विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र स्कूल बस (School Bus) धोरण करणारे पहिले राज्य आहे. आजच्या बैठकीत आलेल्या सूचना व त्रुटी लक्षात घेऊन धोरणात सुधारणा करण्यात येतील.

उद्दिष्ट – सुरक्षित व सुखकारक प्रवास

या पुढाकाराचा उद्देश विद्यार्थ्यांसाठी प्रवास सुरक्षित, नियमबद्ध आणि शिस्तबद्ध करण्याचा आहे. सरकारच्या या निर्णयामुळे पालकांमध्ये विश्वास वाढेल आणि शालेय वाहतुकीचा दर्जा सुधारेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.