SBI Bank : पेन्शनसाठी रणरणत्या उन्हात वृद्ध महिला बॅंकेत पोहोचली; लोकांनी बॅंकेला चांगलंच सुनावलं

सोशल मीडियावर एका वृद्ध महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ही महिला रणरणत्या उन्हात पायात चप्पल न घालता खुर्चीच्या आधाराने चालताना दिसते.

166

सध्या उष्णतेची जणू लाट आलेली आहे. या वाढलेल्या उष्णतेमुळे जीव हैराण होतो. अशा उन्हात बाहेर पडू नका असाच सल्ला डॉक्टर आपल्याला देतात. परंतु एक अशी घटना घडली ज्यामुळे सर्वांनाच संताप आला. सोशल मीडियावर एका वृद्ध महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ही महिला रणरणत्या उन्हात पायात चप्पल न घालता खुर्चीच्या आधाराने चालताना दिसते.

असं म्हटलं जात आहे की ही वृद्ध महिला एवढ्या रणरणत्या उन्हात पेन्शन घ्यायला (SBI Bank) बॅंकेत जात आहे. या तीव्र उष्णतेत एका वृद्ध महिलेला बॅंकेत बोलवणं योग्य नाही असं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. SBI Bank इंटरनेट वापरकर्त्यांनी SBI बॅंकेला खडे बोल सुनावले आहेत. इतकंच काय तर वित्तीय मंत्री निर्मला सीतारमण यांनी देखील एसबीआय बॅंकेला टॅग करुन ट्वीट केलं आणि आपली नाराजी व्यक्त केली.

(हेही वाचा SBI Bank : बॅंकेत पुरेशा सुविधा नाहीत? आता काही मिनिटांत करा तक्रार; SBI ने ट्वीट करत दिली माहिती)

वृद्ध महिलेचा हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही तिची दया येईल:

निर्मला सीतारमण यांनी ट्वीट करत म्हटलं, “Can see the manager of the @TheOfficialSBI responding but yet wish @DFS_India and @TheOfficialSBI take cognisance of this and act humanely. Are they no bank Mitra? @FinMinIndia”

या महिलेचं नाव सूर्या हरीजन असून ही ७० वर्षांची आहे. ओडिशाच्या झारीगांव येथील SBI Bank बॅंकेत पेन्शन घेण्यासाठी ती जात होती. मॅनेजरच्या म्हणण्यानुसार फिंगर प्रिंटमध्ये समस्या निर्माण झाल्यामुळे तिला पैसे काढण्यात त्रास होत होता. बॅंक लवकरच यावर उपाय करणार असल्याचे देखील म्हटले आहे. तरी देखील या महिलेला इतका त्रास सहन करावा लागला म्हणून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशाप्रकारच्या घटना घडल्या तर निषेध व्यक्त करुन भविष्यात अशा घटना घडू नये याची काळजी घेणे देखील आवश्यक आहे.

(हेही वाचा SBI Bank : बॅंकेत पुरेशा सुविधा नाहीत? आता काही मिनिटांत करा तक्रार; SBI ने ट्वीट करत दिली माहिती)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.