Say Bharat instead of India : ‘इंडिया’ नको ‘भारत’ म्हणा – सरसंघचालक मोहन भागवत

शतकानुशतके आपल्या देशाचे नाव भारत आहे, भाषा कोणतीही असो नाव तेच राहते – सरसंघचालक मोहन भागवत

167
Say Bharat instead of India : ‘इंडिया’ नको ‘भारत’ म्हणा – सरसंघचालक मोहन भागवत
Say Bharat instead of India : ‘इंडिया’ नको ‘भारत’ म्हणा – सरसंघचालक मोहन भागवत

भारत हे नाव प्राचीन काळापासून चालत आलेले आहे, ते पुढेही चालू ठेवावे, असे आवाहन सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशवासियांना केले आहे. ते गुवाहाटी येथे सकल जैन समाजाच्या एका कार्यक्रमाला आले होते. त्या वेळी ते बोलत होते. (Say Bharat instead of India)

सरसंघचालक मोहन भागवत पुढे म्हणाले की, ‘इंडिया’ऐवजी भारत हा शब्द वापरला पाहिजे आणि लोकांना त्याची सवय झाली पाहिजे. शतकानुशतके आपल्या देशाचे नाव भारत आहे. भाषा कोणतीही असो, नाव तेच राहते. भविष्यातही आपण भारत हा शब्द वापरत राहिला पाहिजे. आपल्या देशाचे नाव भारत आहे. आपल्या सर्व व्यवहारांतून इंडिया या शब्दाचा प्रयोग बंद केला पाहिजे. त्याऐवजी भारतच म्हटले पाहिजे, तरच बदल घडून येईल. दुसऱ्यांनीही भारत (Say Bharat instead of India) हा शब्द वापरला पाहिजे. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीला समजावून सांगितले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.

(हेही वाचा – Jalna Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही)

जग आपल्याशिवाय चालू शकत नाही

सर्वांना सोबत घेऊन जाणारा भारत हा एक देश आहे. आज जगाला आपली गरज आहे. हे जग आपल्याशिवाय चालू शकत नाही. आपण योगाच्या माध्यमातून जगालाही जोडले आहे, असे त्यांनी सांगितले. इंग्रजांनी नवीन शिक्षणपद्धत आणली. आपल्या शिक्षणपद्धतीने मुलांच्या मनात देशभक्ती निर्माण होते. विशेष नावांना भाषेत वेगळे करता येत नाही. असा आपला भारत देश आहे, जो शतकानुशतके ‘असतो मा सद्गमय। तमसो मा ज्योतिर्गमय। मृत्योर्मामृतं गमय’ असा प्रवास करतो, जगात कुठेही बोलले जात असेल, तर ते फक्त भारतच असावे, असे मोहन भागवत म्हणाले. (Say Bharat instead of India)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.