MCGM Toilets : महापालिकेच्या शौचालयात विजेसह पाण्याचीही बचत

केंद्र प्रमुख आणि लॉण्ड्री व्यवस्थापकाच्या १२ जणांचा चमू देखभालीसाठी

623
MCGM Toilets : महापालिकेच्या शौचालयात विजेसह पाण्याचीही बचत
MCGM Toilets : महापालिकेच्या शौचालयात विजेसह पाण्याचीही बचत

एम पश्चिम विभागातील चेंबूर येथील पंजाबी चाळ येथे ६४ शौचालय कूप सुविधा केंद्राचे लोकार्पण पालकमंत्री लोढा यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या केंद्रामध्ये वापरात येणाऱ्या यंत्रांसाठी आणि अंतर्गत दिव्यांच्या व्यवस्थेसाठी दोन्ही इमारतींवर मिळून १९ किलोवॅट क्षमतेचे सौर ऊर्जा (सोलार) पॅनेलही लावण्यात आले आहेत. त्यामुळे विजेवर होणारा ७५ टक्के खर्च कमी होण्यासाठी मदत होईल. शौचालयाच्या इमारतीत आरओ वॉटर प्लांट आणि पाणी पुनर्प्रक्रिया करणाऱ्या प्लांटचाही समावेश आहे. स्वच्छता आणि फ्लशसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यावर पुनर्प्रक्रिया करण्यात येईल. पाण्याच्या पुनर्वापरामुळे वर्षापोटी ५० लाख लिटर पाण्याची बचत याठिकाणी करणे शक्य होईल. त्यामुळे या शौचालयाच्या वापरासाठी वीज आणि पाण्याची बचत होणार आहे. (MCGM Toilets)

New Project 72

एम पश्चिम विभागातील चेंबूर येथील पंजाबी चाळ येथे ६४ शौचालय कूप सुविधा केंद्राचे लोकार्पण पालकमंत्री लोढा यांच्या हस्ते सोमवारी १६ ऑक्टोबर २०२३ झाले. या लोकार्पणप्रसंगी उप आयुक्त (परिमंडळ ५) हर्षद काळे, उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) चंदा जाधव, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, एम पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त विश्वास मोटे तसेच हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीचे पदाधिकारी उपस्थित होते. (MCGM Toilets)

New Project 73

मुंबई महानगरपालिकेच्या एम पश्चिम विभागात पंजाबी चाळ येथे पाच हजार लोकसंख्येच्या वस्तीसाठी हिंदुस्तान युनिलिव्हर आणि एचएसबीसी यांच्या सामाजिक दायित्व जबाबदारी (सीएसआर) उपक्रमाच्या माध्यमातून ६४ शौचकुपे असलेल्या शौचालयाचे लोकार्पण करण्यात आले आहे. या केंद्रामध्ये शौचालयासोबतच स्वच्छ पाणी, कपडे धुलाई संयंत्र आदी सुविधा उपलब्ध आहे. महिलांसाठी २८ शौचकुपे असणारे स्वतंत्र शौचालयही उभारण्यात आले आहे. त्याठिकाणी आपत्कालीन स्थितीसाठी पॅनिक बटन आणि सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन देखील पुरवण्यात आले आहे. सॅनिटरी पॅड विल्हेवाट लावणारे संयंत्रही उपलब्ध करून देण्यात आले आहे. पुरूषांसाठी ३८ शौचकुपे असणारे स्वतंत्र शौचालय आहे. त्याठिकाणी हात स्वच्छ धुण्यासाठीची तसेच पाय धुण्याचीही स्वतंत्र व्यवस्था आहे. (MCGM Toilets)

New Project 74

(हेही वाचा – Mumbai Police : कर्ज फेडण्यासाठी पोलीस बनला दरोडेखोर)

दोन्ही शौचालयांच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही यंत्रणा लावलेली आहे. नाममात्र शुल्क देऊन नागरिकांना शौचालय, स्वच्छ पाणी तसेच लॉण्ड्री सुविधेचा वापर करता येणार आहे. या प्रसाधनगृहाच्या देखभालीसाठीच्या निमित्ताने एकूण दहा स्थानिक व्यक्तींना याठिकाणी रोजगार उपलब्ध झाला आहे. महिला आणि पुरूष अशा दोन्हींचा यामध्ये समावेश आहे. तर केंद्र प्रमुख आणि लॉण्ड्री व्यवस्थापक अशा पद्धतीने १२ जणांचे पथक याठिकाणी देखभाल आणि सेवेसाठी कार्यरत असेल. (MCGM Toilets)

New Project 75

गरजू जनतेसाठी सार्वजनिक प्रसाधनगृहांची दुरुस्ती, नवीन व आधुनिक सुविधांनी परिपूर्ण प्रसाधनगृहांची निर्मिती, सार्वजनिक शौचालयांची नियमित स्वच्छता व निर्जंतुकीकरण आदी बाबींवर विद्यमान राज्य सरकारने भर दिला आहे. आधुनिक सुविधा असणारी प्रसाधनगृहे संपूर्ण मुंबईत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या आधुनिक प्रसाधनगृहांची देखरेख स्थानिक प्रशासन करत असताना, स्थानिक नागरिकांनीही त्यांचे पालकत्व स्वीकारत सरकारला, महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे. लोकसहभागातून हे मॉडेल यशस्वी होवू शकते, याची खात्री आहे, असे उद्गार राज्याचे कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काढले. (MCGM Toilets)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.