सौदी अरेबियाने (Saudi Arabia) 2034 मध्ये होणाऱ्या फिफा फुटबॉल विश्वचषकापूर्वी दारू बंदी उठवली आहे. १९५२ नंतर तब्बल ७३ वर्ष जुना निर्णय सौदीने केवळ पैशासाठी बदलला आहे. या निर्णयानुसार सौदी अरेबियाने २०२६ पासून मर्यादित प्रमाणात दारू विक्री आणि सेवन करण्यास परवानगी दिली आहे. हे धोरण निवडक पर्यटन क्षेत्रे आणि आतिथ्य स्थळांना लागू होणार आहे. हा निर्णय व्हिजन २०३०, एक्स्पो २०३० आणि २०३४ मध्ये होणाऱ्या फिफा विश्वचषकापूर्वी जागतिक गुंतवणुकीला चालना देईल, असा सौदीला विश्वास आहे. पण ज्या शरिया कायद्यात मद्यपानाला हराम मानले जाते, तेच हराम कृत्य करण्यास इस्लामी राष्ट्र सौदी अरेबिया (Saudi Arabia) प्रवृत्त करत आहे, त्यावर सौदीला शरिया कायद्याचे वावगे वाटत आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.
(हेही वाचा ‘लाल बाल पाल’मधील पंजाब, बंगाल हातून गेले आता महाराष्ट्र वाचवा; Ranjit Savarkar यांनी दिला धोक्याचा इशारा)
सौदीने घेतलेल्या निर्णयानुसार दारू विक्री काही विशिष्ट क्षेत्रांपुरती मर्यादित असेल. सौदी अरेबियातील (Saudi Arabia) सुमारे ६०० ठिकाणे ही दारू विक्री करता येणार आहे. त्यात बहुतेक लक्झरी हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि पर्यटकांसाठी विकसित केलेली क्षेत्रे असतील. परवानगी असलेल्या ठिकाणी बिअर, वाईन आणि सायडर मिळू शकतात. स्पिरिट्ससारखे मजबूत अल्कोहोलिक पेयला अजूनही परवानगी नाही. सरकारने घर, दुकान किंवा सार्वजनिक ठिकाणी अल्कोहोलला परवानगी दिली नाही. वैयक्तिक अल्कोहोल उत्पादनावर देखील बंदी राहणार आहे.
सौदी अरेबियाचा व्हिजन २०३० प्लॅन
दारू धोरण हे व्हिजन २०३० चा एक भाग आहे. सौदी अरेबियाची (Saudi Arabia)अर्थव्यवस्था वाढवण्याची ही राष्ट्रीय योजना आहे. पर्यटन, मनोरंजन आणि आदरातिथ्य वाढवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की या बदलामुळे रोजगार निर्माण होण्यास आणि परदेशी गुंतवणूक आणण्यास मदत होईल.
Join Our WhatsApp Community