Sassoon Report: पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला ‘त्या’ प्रकरणात क्लिनचीट

1056
Sassoon Report: पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला ‘त्या’ प्रकरणात क्लिनचीट
Sassoon Report: पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला ‘त्या’ प्रकरणात क्लिनचीट
Sassoon Report : पुण्यातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला (Dinanath Mangeshkar Hospital) तात्पुरता दिलासा मिळाला असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीचा ६ पानांचा अहवाल पुणे पोलिसांना सादर करण्यात आला आहे. त्यामध्ये ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीने अहवालात मंगेशकर रुग्णालय आणि डॉ. घैसास यांच्यावर ठपका ठेवला नसल्याची माहिती आहे. पुणे पोलिसांनी अहवालातील चार मुद्द्यांवर पुन्हा एकदा ससूनकडून अभिप्राय मागितल्याची माहिती आहे.  (Sassoon Report)

(हेही वाचा – Suicide : शेअर बाजारात लाखो रुपये बुडाले; माथाडी कामगाराने स्वतः वर झाडली गोळी)

दरम्यान, पुण्यातील तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी (Tanisha Bhise death case) ससूनचा बहुप्रतिक्षित अहवाल वैद्यकीय शिक्षण सचिवांना सादर करण्यात आला आहे. अहवालाची प्रत पुणे पोलिसांनाही पोस्टाने पाठवली आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये वैद्यकीय हलगर्जीपणा झाला का याचा ससूनच्या सहा डॉक्टरांकडून तपास करण्यात आला. या आधी तीन समित्यांचे अहवाल आधीच सादर करण्यात आले असून,  त्यापैकी दोन अहवालात रूग्णालयावर ठपका ठेवण्यात आला आहे.

डॉ. सुश्रूत घैसास यांना पोलिस संरक्षण
डॉ. सुश्रूत घैसास (Dr. Sushrut Ghaisas) यांना पुणे पोलिसांनी संरक्षण देण्यात आले आहे. डॉ. घैसास यांच्या सुरक्षेसाठी पुणे पोलिसांचा एक कर्मचारी तैनात असणार आहे. डॉ. घैसास यांना येत असलेले धमकीचे फोन आणि त्यांनी पुण्याबाहेर जाऊ नये यासाठी खबरदारी म्हणून पोलिसांकडून हे संरक्षण पुरवण्यात आल्याची माहिती आहे.

(हेही वाचा – बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी अखेर मिळणार; BMC ने देऊ केलेल्या निधीपैकी ५० टक्के रक्कम राखीव ठेवणार)

नेमकं प्रकरण काय ?
दरम्यान, २८ मार्च रोजी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गर्भवती तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला आहे. तनिषा भिसे यांना रक्तस्त्राव होत असताना देखील येथील प्रशासनाने उपचार केले नाहीत. तसेच रुग्णासमोरच कुटुंबीयांना १० लाखांची मागणी केली होती. त्याशिवाय उपचार केले जाणार नाहीत, असे सांगण्यात आले होते. यानंतर तनिषा भिसे यांना दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आले. दोन जुळ्या बाळांना जन्म देऊन तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.