जामीन मिळाला, क्लीनचिट नाही, भाजपचा संजय राऊतांना गर्भीत इशारा

108
पत्राचाळ प्रकरणात मागील १०२ दिवसांपासून तुरुंगात राहिलेले शिवसेना नेते संजय राऊत यांना पीएमएलए कोर्टाने बुधवार, ९ नोव्हेंबर रोजी जामीन मंजूर केला. संध्याकाळी राऊत यांची सुटका झाल्यानंतर तब्बल ३ तासांहून अधिक काळ त्याची एकप्रकारे मिरवणूक काढण्यात आली. यावर भाजपने गर्भीत इशारा दिला आहे. भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करून ‘जामीन मिळाला, क्लीनचिट नाही आणि हो या खटल्याचा निकाल लागेल तेव्हा हे अमृतवचन आठवेल ना?, अशा शब्दांत प्रतिक्रिया दिली. कारण राऊत यांनी तुरुंगातून बाहेर पडल्यावर, ‘न्यायदेवतेवरील माझा विश्वास वाढला आहे’, असे म्हटले होते.

हिशेब अजून बाकी आहे 

तर भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी ट्विट करत, ‘पुन्हा मैदानात उतरावे लागणार, असे वाटत आहे, असे म्हटले आहे.

मोहित कंबोज यांनीही संजय राऊत यांच्या विरोधात तीव्र शब्दांत टीका केल्या होत्या. तर भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी, कुणाला अटक केल्यानंतर जामीन मिळत असतोच, ही कायद्याची प्रक्रिया आहे, पण म्हणून ते निर्दोष सुटले असे म्हणता येत नाही. या प्रकरणाचा निकाल लागेल तेव्हा चित्र काय असेल हे पाहावे लागेल. गजू मारणे हा गुंडही जामिन्यावर तुरुंगातून सुटला होता, तेव्हा मिरवणूक काढली आणि पुन्हा आत गेला’, असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले. तर भाजपचे नेते किरीट सोमय्या म्हणाले की, राऊत यांना नुसता जामीन मिळाला आहे, अजून हिशेब व्हायचा आहे, असे सोमय्या म्हणाले.  अशा प्रकारे भाजपच्या नेत्यांनी संजय राऊत यांची जामिन्यावर सुटका झाली आहे, निर्दोष नाही, असे ठसवण्याचा प्रयत्न झाला.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.