Sangli : ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यासाठी सासरच्यांकडून छळ; ७ महिन्यांच्या गर्भवतीची आत्महत्या

94

धर्मांतरासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून सात महिन्यांच्या गर्भवती महिलेने आत्महत्या केली आहे. सांगली (Sangli) जिल्ह्यात सासरच्या लोकांकडून ख्रिस्ती धर्मात धर्मांतरित होण्यासाठी विवाहितेवर दबाव टाकण्यात येत होता. (Tortured for conversion) मृत महिलेच्या वडिलांनी सासरच्या लोकांवर हा गंभीर आरोप केला आहे. त्यानंतर कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी पतीसह सासू-सासऱ्यांना अटक केलेली आहे.

(हेही वाचा – PM Modi Canada Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कॅनडा दौऱ्यापूर्वीच खलिस्तानी दहशतवाद्यांचा सुपडा साफ होणार; अमेरिका सुरू करणार मोहीम  )

ऋतुजा राजगे (Rituja Rajge) असे या मयत महिलेचे नाव आहे. सासरच्या मंडळींकडून ख्रिस्ती धर्म (Christianity) स्वीकारण्यासाठी ऋतुजाचा छळ केला जात असल्याचा आरोप आहे. ६ जून या दिवशी ऋतुजाने तिच्या सासरच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. धर्मांतर करण्यासाठी तिच्यावर वारंवार सक्ती करण्यात येत होती, असा आरोप ऋतुजाच्या वडिलांनी केलेला आहे. या छळाला कंटाळूनच ऋतुजाने आत्महत्या केल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२१ मध्ये ऋतुजा आणि सुकुमार यांचा विवाह झाला. विवाहापूर्वी राजगे कुटुंबाने स्वतःला हिंदू धनगर असल्याचं सांगितले होते. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच हे कुटुंब ख्रिश्चन असल्याचे ऋतुजा आणि तिच्या माहेरच्या मंडळींच्या लक्षात आलं. याकडे दुर्लक्ष करून ऋतुजा संसार करत होती. पण, पती सुकुमार, सासरे सुरेश आणि सासू अलका यांनी ऋतुजावर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. तिला हिंदू देवतांना नमस्कार करणे बंद करण्यास आणि चर्चला येण्यास सांगितलं. तिला सांगलीतील राममंदिर कॉर्नर येथील चर्च आणि मिरज खतिबनगर येथील पत्र्याच्या शेडमधील चर्चमध्ये नेऊन धर्मांतरासाठी जबरदस्ती केली गेली. चर्चमधील पास्टरांनीही तिच्या हिंदु धर्माच्या पूजेमुळे कुटुंबाला अडचणी येत असल्याचे सांगितले.

ऋतुजाने आपल्या आई-वडिलांना या त्रासाबद्दल सांगितले होते. त्यांनी अनेकदा सासरच्या मंडळींची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; पण सासू-सासरे आणि पती यांनी तिला हिंदु धर्म (Hinduism) सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याचा तगादा लावला. या सततच्या मानसिक छळाला आणि दबावाला कंटाळून ऋतुजाने सात महिन्यांच्या गरोदरपणात गळफास लावून आत्महत्या केली.

धक्कादायक बाब म्हणजे ऋतुजा ७ महिन्यांची गर्भवती होती. या संपूर्ण प्रकरणी ऋतुजाचा पती सुकुमार राजगे, सासू अल्का राजगे आणि सासरे सुरेश राजगे यांना अटक करण्यात आली आहे. (Sangli)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.